shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री दत्त जयंती आणी परशुराम महाराज यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रास तरुणाईचा भरगोस प्रतिसाद !


भीमा कोरेगाव ते भीमा कोरेगाव. सोडा सोडा राया हा नाद खुळा .. चंद्रा. या गीतांवर थिरकली तरुणाई 

राजेंद्र दूनबळे - शिर्डी
राहाता तालुक्यातील (शिर्डी जवळील) सावळीविहीर येथे  श्री दत्त जयंती आणी येथील ग्रामदैवत असलेले परशुराम महाराज यांच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने "शिवानी चा नादच खुळा" या संगीत ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,

 दिनांक २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली,प्रथम कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी श्री साईबाबा. छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून  त्यांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी सावळीविहीर चे लोकनियुक्त सरपंच 
ओमेश जपे. ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, रमेश आगलावे, राजेंद्र आगलावे, शांताराम जपे, गणेश कापसे, गणेश आगलावे, राजेंद्र दुनबळे ,राजेंद्र गडकरी, संदीप विघे, कैलास सदाफळ, ज्ञानेश्वर जपे,अनिल वाघमारे,बापू जपे, स्वप्निल पारडे, सुनील जपे, बंटी जाधव, किशोर आगलावे, गणेश बनसोडे, शरद आगलावे, पो.पा.वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी "भीमा कोरेगाव ते भीमा कोरेगाव" चंद्रा.. सोडा सोडा राया.. लैला मै लैला.. सारा जमाना हसीनो का दिवाना.. पाहून जेवला काय...आदी सुपरहिट गाण्यांनी सदर ऑर्केस्ट्रा ने येथील ग्रामस्थ व तरुणांच्या गीतांवर शाबासकी मिळवली. यावेळी या संगीतमय कार्यक्रमात तरुणांचा जल्लोष पाहण्यास मिळाला. अतिशय सुंदर पद्धतीने या ऑर्केस्ट्राचे नियोजन सावळविहीर ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सावळीविही येथील ग्रामपंचायत समोर भव्य असा स्टेजवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संगीतमय कार्यक्रमात लोकांची साथ घालत या "शिवानी चा नाद खुळा" हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रेक्षकांची दाद, टाळ्या व आनंद यावेळेस पाहण्यास मिळाले.


छत्रपती शिवाजी महाराज. श्री साईबाबा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांना उपस्थित जनसमुदायांकडून उदंड असा प्रतिसाद मिळाला,या कार्यक्रमास.महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर तसेच.  ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी त्याचप्रमाणे वि.का. सोसायटी सावळीविहीर चे सर्व सभासद व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close