shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

*इंदापूर महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*
    इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका शिक्षण  प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
      महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचार सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी दिली.
   डॉ. शिवाजी वीर ,डॉ. भिमाजी भोर ,डॉ.दिगंबर बिरादार, डॉ .प्रज्ञा लामतुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून  दिली.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले. प्रा श्याम सतार्ले यांनी आभार मानले.
close