shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तीन समाजरत्नांची कहाणी..!


     सातारा येथे असताना गाडगेबाबांची प्रकृती साथ देत नव्हती. तेव्हा बाबांनी आर्वजून डाँ. आंबेडकरांना भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच  आंबेडकरांनी आपली  कामे बाजूला ठेवून सातारा गाठले. आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना खूप समाधान वाटले. त्यानी आपल्या उशिखालून कांही  दस्त काढले .ते आंबेडकरांच्या हातात देत बाबा म्हणाले "सायबा" ही लाख मोलाची दौलत हाय. तवा ही दौलत योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार आहे.म्हणून "सायबा" तुला बोलावलो बघ. "हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा."

  'आंबेडकरानी' दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता. त्या  सर्व जमिनीचे सर्व अधिकार  गाडगेबाबांनी आंबेडकरांना दिले होते. दान मिळालेल्या  जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच बाबांची इच्छा ओळखून आंबेडकरानी कर्मवीर भाऊराव पाटलांना निरोप दिला आणि ती सर्व  जमिन आंबेडकरांनी गाडगेबाबांच्या समक्ष रयत शिक्षण संस्थेचे  कर्मवीर आण्णा यांना (भाऊराव पाटील) बहाल केली.
अशा या तीन महान कर्मवीरांना विनम्र अभिवादन..!
    (वरील जो फोटो आहे, दुर्मिळ फोटो संग्रहातून)
close