श्रीरामपूर प्रतिनिधी:
वारकरी संप्रदायातील संत तुकोबारायांचे अभंग तळागाळापर्यंत पोहचून सर्वसामान्यांच्या अंतकरणात रुजवण्याचे महान कार्य संतश्रेष्ठ जगनाडे महाराज यांनी केल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की, संत संताजी महाराज जगनाडे हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते. संत तुकाराम महाराजांची उस्फूर्त प्रतिभा, त्यांची अभंग संपदा संत जगनाडे महाराज यांनी केवळ शब्दांकित, लिखित केली नाही तर तिचे जीवापाड जतनही केले.
याप्रसंगी संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, मा.नगरसेवक दिलीप नागरे, के. सी. शेळके, आशिष धनवटे, मिथुन शेळके, मर्चंट असोसिएशनचे संचालक निलेश नागले, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, सनी मंडलिक, भगवान जाधव, डॉ राजेंद्र लोंढे, सरबजीतसिंग चूग, युनुस पटेल, बाबा वायदंडे, योगेश गायकवाड, सुरेश बनसोडे, संजय गोसावी, राजेश जोंधळे, गोपाल भोसले, साळुंखे सर, प्रकाश काळे, सोमनाथ आढाव, श्रीराम मगर, रोहित करपे, वनदेव सोनवणे, नंदकुमार राऊत, राहुल गाडेकर, अनिल जाधव, रामा भोज, कृष्णा आढाव, सौ.कोते मॅडम, चौधरी ताई आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

