shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय संविधानाचा आत्मा म्हणजे उद्देशिका -विजयराव खाजेकर

श्रीरामपूर:-
नव स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान दिन व क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांना नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.

यावेळी विजयराव खाजेकर म्हणाले की भारतीय संविधानाचा आत्मा. संविधानाची उद्देशिका आहे या उद्देशिकेचे पालन खरे मनापासून केले तर स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय ही तत्व प्रणाली जनतेमध्ये प्रस्थापित होऊन देशाचा विकास होईल . तसेच महात्मा ज्योतिराव फुले  यांनी स्री शिक्षणाची चळवळ उभी करून स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचाराची मांडणी महात्मा फुले यांनी केली समाज हितासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ज्योतिबा फुले खऱ्या अर्थाने महात्मा आहेत. असेही ते म्हणाले
 या कार्यक्रमास संजय वाहुळ, राजू भाई जागीरदार ,भाऊसाहेब खरात ,मुस्ताक शेख ,रमाताई भालेराव ,मुस्ताक तांबोळी, प्रवीण शहा , डॉक्टर पगारे , अमोल शेळके, इब्राहिम शेख, प्रवीण साळवे ,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close