shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेड क्रॉस चे वतीने जिल्ह्यात पाच हजार पल्स ऑक्सी मीटरचे वाटप


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्यावतीने जिल्ह्यातील हॉस्पिटल्स व डॉक्टर्स यांना पाच हजार पल्स ऑक्सीमिटर चे वितरण करण्यात आले.
          रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे शुभ हस्ते oximeter वितरीत करण्यात आले.


          सचिव सुनील साळवे यांनी प्रास्तविक मध्ये संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर संजय दुशींग यांनी क्षयरोग व कुष्ठरोग विषयी माहिती दिली. यावेळी कुष्ठ रोग व क्षयरोग निर्मूलन प्रसारासाठी रेड क्रॉस सोसायटीने दिलेल्या माहितीपत्रक चे प्रकाशन किरण सावंत यांचे हस्ते झाले.यावेळी नूतन सदस्य केशव घायगुडे, सुरंजन साळवे, अवधूत कुलकर्णी,ज्ञानदेव माळी, विपुल गागरे,सविता साळुंके,गौरी भांड आदींचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
       डॉ. कल्पेश पाटील,डॉ.रमेश गाढवे,केशव घायगुडे आदींनी मनोगत व्यक्त करताना रेड क्रॉस कार्याचे कौतुक केले.
        अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना किरण सावंत म्हणाले, रेड क्रॉस आरोग्य क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करत आहेत तेव्हा आरोग्यनिगडित सेवकांनी या आंतरराष्ट्रीय संस्थेत येऊन समर्पित वृत्तीने काम केले पाहिजे त्यातून मानसिक समाधान मिळते
शासकीय उपक्रम राबविताना अनेक नियम बंधने अडचणी असतात परंतु इथे आपण स्वतंत्र विचाराने काम करू शकता तेव्हा युवा पिढीने रेड क्रॉस चे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा अध्यक्ष किरण सावंत पाटील यांनी केले.
 सूत्रसंचलन नानासाहेब मुठे यांनी केले,कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष किरण सावंत,व्हाईस चेअरमन मिलिंद वाघ,सुनील साळवे,प्रवीण साळवे,पोपटराव शेळके, भरत कुंकुलोळ,सुरेश वाघुले संजय दुशिंग,किरण सोनवणे,विश्वास भोसले, सोपान नन्नवरे,संतोष जाधव,अरुण कतारे,बन्सी फेरवानी,अवधूत कुलकर्णी, सूरजण साळवे,विनोद हिंग्निकर, विपुल गागरे,साहेबराव रकते, मधुकर येडे,नानासाहेब मुठे, शाम हेलकुटे, बछाव सर,ज्ञानदेव माळी,सविता साळुंके,शोभा शेंडगे, पुष्पा शिंदे, माया चाबुकस्वार, गौरी भांड.आदींनी परिश्रम घेतले.
         यावेळी जिल्ह्यातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी-  स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close