श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील सूत गिरणी परिसरात रेणुका माता मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या श्रीमती सीताबाई नामदेव मटाले यांचे गुरुवार दि . ३० नोव्हेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ९५ वर्षांचे होते.
धार्मिक वृत्ती आणि मनमिळावू स्वभाव असणाऱ्या सीताबाई मटाले या ' काकू ' या नावाने ओळखल्या जायच्या . त्यांच्या पश्चात एक मुलगा , चार मुली , सुना , पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. बाबासाहेब मटाले यांच्या त्या मातोश्री तर काशिनाथ, चंद्रकांत व आप्पासाहेब मटाले यांच्या चुलती आणि रवींद्र, बाळसाहेब व गणेश यांच्या त्या आजी होत.
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

