shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवभारत साक्षरता अभियानाची शिक्षकांना सक्ती केल्यास शिक्षक समिती याचिका दाखल करणार - मा राज्याध्यक्ष उदय शिंदे.*


*नवभारत साक्षरता अभियानाची  शिक्षकांना सक्ती केल्यास शिक्षक समिती याचिका दाखल करणार - मा राज्याध्यक्ष उदय शिंदे.*

*अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर पुर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचे आदेश काढण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयन्त सुरु.*
इंदापूर प्रतिनिधी: दि २४ निमगाव केतकी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष उदय शिंदे व शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर कार्यक्रमाचे निमित्ताने आले असता शिक्षक समितीचे इंदापूर व धाराशिव जिल्ह्यांतील पदाधिकारी व शिक्षक यांनी राज्य शासन पातळीवर प्रश्न सविस्तर चर्चा केली.
         *राज्य नेते उदय शिंदे यांनी सांगितले नवभारत साक्षरता अभियानातून शिक्षकांना न वगळल्यास शिक्षक समिती कोर्टात याचिका दाखल करून न्याय मागणार असून शिक्षकांनी कोणत्याही कार्यवाहीला न घाबरता सर्वेक्षण अभियान काम करू नका शिक्षक समिती पूर्ण ताकदीने शिक्षकांचे पाठीशी उभी आहे.* त्याचप्रमाणे संतोष हेगडे यांनी सांगितले की हिवाळी अधिवेशनात मा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले प्रमाणे ३१ मे २००५ पुर्वी जाहिरात आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लाभ देण्यात येणार आहे. मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून लवकरच पत्र काढण्यासाठी पाठपुरावा करावा. प्रसंगी शिक्षकांचे विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी *पुणे जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक नेते किरण म्हेत्रे , इंदापूर तालुका शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती संतोष हेगडे यांनी दिली.

close