shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सत्तांतरानंतर पहील्याच ग्रामसभेत विरोधक आक्रमक - ग्रामसभेत धमक्या व दमदाटी


*नवनिर्वाचीत सरपंचांच्या भाषनाविनाच संपली ग्रामसभा

चंद्रकांत झुरंगे - भोकर
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सर्वांना द्या, अतिक्रमण काढा, सरकारी जागेत घरकुल बांधुन द्या आदिंसह विविध विषयांवर वादळी चर्चा होत असताना टाक्यांना कंपांऊंड बांधा अन्यथा पुढची ग्रामसभा होवू देणार नाही असा धमकी वजा इशारा देत आपण मांडलेले ठराव आमच्या समक्ष प्रोसीडींगला लीहुन घ्या असा आग्रह धरत विरोधकांनी नव्याने निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांना धारेवर धरायचा प्रयत्न करत भोकरची ग्रामसभा नवनिर्वाचीत सरपंचांच्या मार्गदर्शक भाषणाविनाच संपविण्यात आली यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचीत सरपंच व सदस्य मंडळाच्या कार्यकाळातील पहील्याच ग्रामसभेत विरोधकांनी प्रश्नाचा भडीमार करत सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न झाला. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.शितलताई पटारे ह्या होत्या तर ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, उपसरपंच सागर आहेर, कृषी सहाय्यक रूपाली काळे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, रामदास शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे, भिकाजी पोखरकर, भाऊसाहेब पटारे, सुर्यभान शेळके, प्रताप पटारे, संदिप गांधले, गीरीष मते, काळू गायकवाड, विजय अमोलीक, मच्छींद्र खंडागळे, ज्योती डूकरे, छाया आहेर, सतीष शेळके, सागर शिंदे, किशोर मते, नारायण पटारे आदि प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.

नेहमीप्रमाणे मागील सभेचे प्रोसीडींग संपताच ग्रामविकास अधिकार्‍यांनी सन 2024-25 चा आराखडा मांडत विविध कामांच्या सुचना करून या कृती आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यात सोसायटी प्रांगणातील रस्ता काँक्रीट करण्यास मंजूरी देण्यात आली असली तरी अगोदर येथे भुमीगत गटार बांधण्यात आल्याशिवाय रस्त्याचे काम न करण्याच्या सुचना करण्यात आल्या. त्याच बरोबर हनुमानवाडी वस्ती शाळेस कंपाऊड प्राधान्याने करण्यात यावे. हायस्कुल प्रांगणातील टाकीतून जि प शाळा प्रांगणाच्या टाकीत पाणी टाकण्यात यावे आदिंसह अनेक कामांच्या आराखड्यास ग्रामसभेतने मंजूरी दिली.

त्यानंतर खर्‍या अर्थाने सुरू झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदविला त्यात गंगाराम गायकवाड यांनी आमच्या परीसरातील भुईटाक्यांना आगोदर सरंक्षक कंपाऊंड करा अन्यथा पुढची ग्रामसभा होवू देणार नाही असा धमकी वजा इशारा दिला तर सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे व सागर शिंदे यांनी यापुढे 50 हजाराच्या पुढील कामे ऑनलाईन पद्धतीने करण्याचा ठराव मांडत ग्रामस्थांच्या संमती व मंजूरी विनाच तातडीने प्रोसीडींगला नोंदविण्याचा आग्रह धरला मात्र यामागचे कारण  उशीरापर्यंत अनेकांना स्पष्ट न झाल्याने यावर नंतर अनेकांची कुजबूज सुरू होती. सागर शिंदे यांनी शिंदेवस्तीचा हायस्कुल कंपाऊड मधून येणारा रस्ता बंद करू नका अशी सुचना केली. भाजपाचे सतीष शेळके यांनी ग्रामसभेस आरोग्य विभागाचे कुणीच उपस्थीत नसल्याने त्यांचेवर कारवाईची मागणी केली. यावेळी सर्वानुमते श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरासाठी लोकप्रतिनिधींकडून सभा मंडपास निधीची मागणीस संमती देण्यात आली.

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ केवळ अन्नधान्याच्या लाभार्थींनाच दिला जातो हे चुकीचे आहे त्याऐवजी या योजनेचा लाभ महात्मा फुले योजनेप्रमाणे सर्वांना द्यावा असा ठराव सुदाम पटारे व चंद्रकांत झुरंगे यांनी मांडला त्यास सर्वांनुमते मंजूरी देण्यात आली. 21 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असताना ही लाभार्थी बांधकाम करत नसल्याने ते रद्द करण्याचा शासनाच्या सुचनेस या ग्रामसभेने मुदत वाढ दिली या व्यतिरिक्त 41 घरकुल लाभार्थींना जागा नसल्याचे ग्रामविकास अधिकार्‍यांनी सांगीतले. त्यावर रामदास शिंदे यांनी सर्वांना पंडीत दिनदयाल योजनेत बसवुन ती रक्कम एकत्रीत करून एक प्लॉट खरेदी करून त्या ठिकाणी या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास जागा उपलब्ध करून द्यावी अशी सुचना केली. त्याच बरोबर गट नं. 2 हा 18 एकरांचा प्लॉट सरकारी आहे त्यावर एक एकराची आदिवासी समाजाची दफनभुमी झाल्यानंतर उर्वरीत जागा रिकामी असल्याने या जागेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून हि जागा घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सुचना करण्यात आली त्यास सरपंचासह सर्वांनी मंजूरी दिली. 

यावेळी माणीकदेव रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी गणेश विधाटे यांनी केली, कारेगाव रोडपासून पुढे 15 चारीच्या कडेच्या रोडवर मुरमीकरण करण्याची मागणी प्रहारचे नानासाहेब तागड यांनी केली. हायस्कुलकडे जाणार्‍या रस्त्यासह अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेले असलेले उकीरडे हलविण्यात यावे अशी मागणी गोरख डूकरे यांनी केली. सुनिल वाकडे यांनी हायस्कुल रोडवरचे अतिक्रमण तातडीने काढून या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी केली. या सभेत सत्तांतरामुळे विरोधात गेलेले तत्कालीन सत्ताधारी या ग्रामसभेत आक्रमक झाल्याचे दिसले असले तरी यापुढे आम्ही ही योग्य पद्धतीने ग्रामसभा हाताळणार असल्याचे सत्ताधार्‍यांनी सांगीतले.

यावेळी राजेंद्र चौधरी, निखील कांबळे, भाऊसाहेब चव्हाण, पप्पू थोरात, सेनेचे दत्तात्रय पटारे, गोविंद साळवे, वाल्मीक जाधव, पुंजाहरी चौधरी, संदिप मते, विठ्ठल मते, रमेश भालके, प्रणय पटारे, भाऊसाहेब शिंदे, संदिप अमोलीक, काळू गायकवाड, गंगाराम गायकवाड, तुकाराम बिरदौडे, सुनिल वाकडे, आण्णासाहेब शेळके, रावसाहेब लोखंडे, दादा मैराळ, आप्पासाहेब खैरे, जगन्नाथ विश्वास सर, बबन आहेर, अभिषेक शिंदे, आप्पासाहेब लोखंडे, भास्कर डूकरे, भास्कर गायकवाड, दिगंबर खंडागळे, अशोक शेळके, कैलास मते, पोपट वाकडे, पोपट पटारे, मोहन पांढरे, नंदू शिंदे, पोपट मांजरे, अशोक शेळके, ज्ञानेश्वर शिंदे, गोरख शिंदे, मैदाबाई सोनवणे आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.


*चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close