शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रवीवार दिनांक १० डिसेंबर २०२३
नगर-शिर्डी रस्त्यावरील कोल्हार पुलाच्या दुरुस्तीचे खा. लोखंडे यांचे हस्ते उद्घाटन..!!
राहुरी : नगर मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा या साठी गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी कृती समितीच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात वर्षाश्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार होते.परंतु शिर्डी लोकसभेचे जलदूत खा.सदाशिव लोखंडे यांनी रस्ता कृती समितीचे सदस्य व NHI रस्त्याचे अधिकारी,ठेकेदार यांची बैठक लावत तात्काळ रस्ता दुरुस्त व्हावा या साठी निर्देश दिले होते.
याच विषयास अनुसरून शुक्रवार दि.८ रोजी खा.लोखंडे यांनी शिर्डी येथे पुन्हा राष्ट्रीय राज्य महामार्गच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नगर ते सावळी विहीर रस्त्याच्या कामा विषयी आढावा घेतला.खा.सदाशिव लोखंडे यांनी नगर शिर्डी रस्त्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी सायंकाळी खा.सदाशिव लोखंडे यांनी नगर ते शिर्डीला जोडणारा कोल्हार पुलाच्या दुरुस्ती कामाचे उदघाटन केले.यावेळी युवा नेते प्रशांत लोखंडे, रस्ता दुरुस्ती कृती समितीचे तथा शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,सतीश घुले,किशोर गोसावी,प्रकाश शिरसाठ,सदानंद शिरसाठ, राष्ट्रीय राज्य महामार्गाचे अभियंता अलोक सिंग,अनिल गोरड,ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा.सदाशिव लोखंडे म्हणाले की नगर शिर्डी रस्त्याचा प्रश्न अधिक संवेदनशील झालेला आहे.या रस्त्यावर जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा व शनिशिंगणापूर येथिल शनी देवाच्या दर्शनाला देश-विदेशातून भाविक येत असतात,तसेच याच रस्त्यावरून जिल्ह्यातील मुख्य दळवळण व्यवस्था अवलंबून आहे.त्यामुळे या रस्त्याच्या विषयात ना.नितीन गडकरी यांनी लक्ष घालण्यासाठी विनंती केली आहे.जो पर्यंत नगर शिर्डी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही स्वस्थ बसणार नाही असे खा.लोखंडे म्हणाले.
"यावेळी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी जोगेश्वरी आखाडा, राहुरी येथिल रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याचे निदर्शनास आणून दिल्या नंतर खा. सदाशिव लोखंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची रस्त्यावर उभे करून धारेवर धरत रात्रीच्या थंडीत चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले."
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

