शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३
कृषी विद्यापीठातील कुलगुरुंच्या हट्टापाई सहाय्यक अधिक्षकाविरूद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल ; वर्ग तीन कर्माच्याऱ्यासाठी लाखों रुपयांची उधळणपट्टी..!!
राहुरी (कृषी विद्यापीठ) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कुलगुरू डॉ प्रशांत पाटील मनमानी व हिटलरशाही पद्धतीने काम करत आहेत.याची प्रचिती लेखा विभागात काम करणाऱ्या एका साहाय्यक अधिक्षकास नुकतीच आली.कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांना हा अधिक्षक खोटी बिले पारित करण्यात अडचण करतोय असे लक्षात आले.त्यांनी लगेच आदेश काढला व त्यांची बदली कृषी महाविद्यालयं, नंदूरबार येथे करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या कर्माचाऱ्यास मागील तिमाहीत उत्कृष्ट काम केल्याबददल प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. या कर्मचाऱ्याने स्थानिक आमदार व कार्यकारी परिषद सदस्य याना माहिती दिली व विनंती केली,परंतु त्यांना कुलगुरूंनी नकार दिला. त्यामुळे तीन वर्षाच्या आत या कर्माच्याराची बदली केल्याने नाईलाजाने त्याने औरंगाबाद हायकोर्ट येथे विद्यापीठ प्रशासनाकडून अवैध्यरित्या बदली केल्याने दावा दाखल केला.
हायकोर्टाने याचिका दाखल करून या कर्मचाऱ्याची बदली रद्द करून त्याला राहुरी येथे तत्काळ रुजू करण्याचा आदेश दिला. परंतु हायकोर्ट मध्ये केस हरल्याने कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांचा अहंभाव दुखावला गेला. त्यांनी कुलसचिव डॉ. शिर्के याना तत्काळ आदेश दिला.
कुलगुरुंच्या हट्टापाई कृषी विद्यापीठाने सहाय्यक अधिक्षकाविरूद्ध सुप्रीम कोर्टात याचिका केली दाखल..!!
याच्याविरूद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा. बघू कसा दीड लाख रुपये सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची फी देतो . डॉ. शिर्के यांनी आदेश प्रमाणे लगेच अंमबलजावनी केली व लगेच चार पाच कर्मचारी यांच्यासह विमानाने दिल्ली गाठली. विद्यापीठाचे वकील खरडे यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.त्यात विद्यापीठाचे २ लाख रु. खर्च केले. सहाय्यक अधिक्षक याच्या बदलीने विद्यापीठात असे काय संकट आले की सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी लागली. याबाबत या कर्माचाऱ्याने हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली.
कुलगुरू डॉ प्रशांत पाटील वैयक्तिक राग यासाठी हायकोर्टाचा अवमान करत आहेत.वास्तविक सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी कृषी मंत्री यांची परवानगी घेणे आवश्यक असते.पण कुलगुरू कोणालाच जुमानत नाहीत.तसेच विद्यापीठासमोर असणारे भरती सारखे प्रश्न न सोडवता वर्ग तीन कर्माच्याऱ्यासाठी विद्यापीठाचे लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

