श्रीरामपूर प्रतिनिधी:
शासनाने योजना आखताना किंवा योजनेनंतर महिलांना विविध प्रशिक्षण देऊन पुढे भवितव्य म्हणून मार्केटिंगची व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. वस्तू तयार करताना मार्केटिंगचा प्रश्न निर्माण होतो. फक्त प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम बनविणे नव्हे, तर मार्केटिंग देखील कशा पद्धतीने करावे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना अंतर्गत प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळ आयोजित ग्रामीण कौशल्य केंद्र निपाणी वडगाव यांचे मार्फत तालुक्यातील अशोकनगर येथे कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते.
नुकतेच अशोकनगर येथे महिलांसाठी टेलरिंग लेडीज गारमेंट व मल्टी स्किल टेक्निशियन इलेक्ट्रिकल असा तीन महिन्याचा मोफत कोर्स सुरू करण्यात आला. टेलरिंग मध्ये लहान मुलांचे फ्रॉक, ड्रेस, ब्लाऊज, गाऊन, सनकोट, परकर, ओढणी तसेच इलेक्ट्रिकल मध्ये घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे वॉटर प्युरिफायर,ओव्हन, इस्त्री, फॅन, मिक्सर, बल्ब आधीचे प्रशिक्षण या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे अशी माहिती समन्वयक नंदकुमार धनवटे, प्रफुल्ल वावसे यांनी दिले.
श्री. मुरकुटे म्हणाले की,
टेलरिंग कोर्स मध्ये महिलांनी एका गोष्टीमध्ये विशेषीकरण करावे. त्यामध्ये परकराचा व्यवसाय करणे सोपा आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या भागात गारमेंट्स दुकान चालवून, नफा घेऊन स्वतच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकता. तसेच शासनाचे त्यांच्या विवीध योजनेतून महिलांना कोर्स पुर्ण केल्यानंतर मोफत किंवा अल्पदरात शिलाई मशीन वाटपाची तरतूद करावी.
यावेळी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, जिद्द सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक कारखान्याचे व्हाईस चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक बाबासाहेब आदिक, वाय जी. बनकर, सोपानराव राऊत, प्रफुल्ल दांगट, योगेश विटनोर, ज्ञानदेव पठारे, अच्युतराव बडाख, गीताराम खरात, अशोक पारखे, प्रशांत लिपटे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई गायकवाड, उद्योजक जितेंद्र तोरणे, कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दौंड, ट्रेनर विद्याताई क्षिरसागर, सौ. रत्नमाला धनवटे, सौ. राजर्षी वावसे, सीमा आहेर, सुनिता त्रिभुवन, हेमा शिरसाठ, ट्रेनर शाईन खान आदिंसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

