shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेंट झेवियर्स स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न..!

श्रीरामपूर प्रतिनिधी:
सेंट झेवियर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग जिल्हा न्यायालय श्रीरामपूर आर. बी. गिरी साहेब,आमदार लहुजी कानडे साहेब, शाळेची  माजी विद्यार्थिनी डॉ.श्रुती सेनगांवकर, शाळेचे मॅनेजर  फा. ज्यो गायकवाड,प्राचार्य फा.टायटस, पी.टी.ए चे उपाध्यक्ष विजय खाजेकर, एमपीटी च्या उपाध्यक्षा पूनम लचके, समन्वयिका सौ. अनिता पाठक, सौ. मिलाग्रीन कदम आदींच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली.
शाळेचा वार्षिक अंक "एक्स कॅलिबरचे" प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रकाशनाचे नियोजन अंकाचे समन्वयक रवी त्रिभुवन व सहकाऱ्यांनी केले.
     यानंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ वर्षातील दहावी व बारावी मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मधील के.जी. ते बारावीच्या वर्गातील एक विद्यार्थी निवडून त्यास उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.


  तसेच विविध स्पर्धा, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये  प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरव करण्यात आले.तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.

    यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाची असलेली थीम 'संविधान भारतीयांचा प्राण' यावर आधारित नृत्य व नाटिकांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी पालकांची वाहवा मिळविली.या वार्षिक स्नेहसंमेलनाची विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख समन्वयक आनंद पटेकर शाळेचे प्राचार्य फा. टायटस, शाळेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.‌

*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close