*जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचा जलसंपदा विभागाला सवाल..
शिरसगांव प्रतिनिधी:
अहमदनगर पाटबंधारे विभागाकडून भंडारदरा धरणाच्या रब्बी आवर्तनासाठी नमुना नंबर ७ अर्ज भरून घेतले असून शेतकऱ्यांनी सदर अर्जावर आपली मागणी केली आहे.सदर अर्जाची मुदत १५ डिसेंबर असून ती संपलेली आहे.तरी याबाबत अर्ज भरलेले शेतकरी हे पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक कार्यकारी अभियंता अहमदनगर यांनी १५ डिसेंबरच्या मुदतीनंतर शेती आवर्तन सुरू करणे गरजेचे होते परंतु तसे न करता श्रीरामपूर नगरपालिकच्या पाणी पुरवठ्या करता पिण्याचे आवर्तन घेण्यात आले. सदर पिण्याच्या आवर्तनात श्रीरामपूरच्या वरील भागात पाण्याचा मोठया प्रमाणात अपव्यय होत आहे.
यावरून रब्बीचे आवर्तन कधी घेणार असाही प्रश्न निर्माण होत आहे.खरीपानंतर गेल्या चार महिन्यापासून शेतीसाठी आवर्तन नसल्याने व ग्रामीण भागातील शेततळे व पिण्याचे पाण्याची तळी भरून न दिल्याने यावर्षी धरण कार्यक्षेत्रातील पाणी पातळी खूप खालावली आहे.नोव्हेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असून सदर पावसावर केलेली चारा पिके,गहू,हरभरा आदि पिकांना आज रोजी पाण्याची गरज असूनही सदर पिकांना देण्यासाठी पाणी नाही.तरी दुष्काळी परिस्थितीमध्ये भंडारदरा धरणाचे तातडीने /तात्काळ आवर्तन सुरू करणे गरजेचे आहे. आपणाकडून जायकवाडीस पाणी सोडले त्यावेळीच जायकवडीचे रब्बीचे आवर्तन घेतले गेले.. तरीही आपणाकडे जवळपास शेती सिंचनासाठी ११.५ टी एम सी पाणी असूनही पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहे.याबाबत उपकार्यकारी अभियंता यांना वारंवार फोनवर शेतकरी मागणी करत असून सदर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु कालवा सल्लागार समिती वरील धरण कार्यक्षेत्रातील आमदार यांचे कडून आवर्तन सोडण्यासाठी का दिरंगाई होत आहे.त्यामध्ये लोकप्रतिनिधी नेवासा, श्रीरामपूर, राहता, संगमनेर व अकोले यांचा समावेश असून याबाबत पालकमंत्र्याकडूनही शेतीसाठी आवर्तनाचे कुठलेही नियोजन होताना दिसत नाही. तरी मा. कार्यकारी अभियंता यांनी आपल्या स्तरावर शेतकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन रब्बीचे आवर्तन सुरू करावे. तसेच सिंचन हे टेल टू हेड करावे.अन्यथा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसह अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना कुठल्याही प्रकारचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. अथवा नमुना नंबर सात अर्जा नुसार वेळेत पाणी न दिल्यास पाटबंधारे विभागाकडून अर्ज भरलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई मागण्यात येईल.ही सर्व जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहील असा इशारा श्री. औताडे यांनी कार्यकारी अभियंता अहमदनगर पाटबंधारे विभागाला आपल्या निवेदनात दिला आहे. पत्रकावर ता.अध्यक्ष यु्वराज जगताप, डॉ दादासाहेब आदिक, डॉ विकास नवले, शेतकरी संघटनेचे जेस्ट मार्गदर्शक सुदामराव औताडे -बंडू पा. पटारे,साहेबराव चोरमळ भागचंद औताडे, बनन उघडे, शिवाजी ताके,शैलेश वमने, शरद पवार, दिलीप औताडे, विजय पटारे, मनोज औताडे गोविंद औताडे आदी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 956117411

