shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमोलराजे इंगळे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

अमोलराजे इंगळे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

भाजप नेते  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व 
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष अंकिताताई पाटील - ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अमोलराजे इंगळे यांचे केले अभिनंदन .
इंदापूर प्रतिनिधी: बाभूळगावचे सर्वसामान्य कुटुंबातील एक प्रभावी आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व असणारे सामजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्हा अध्यक्ष अंकिताताई पाटील - ठाकरे यांनी त्यांची नुकतीच निवड केली.
भाजप पदाधिकारी व अमोलराजे इंगळे मित्र परिवाराच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात असून त्यांनी आपला मनमिळावू स्वभावतुन तालुक्यात आपल्या मैत्रीचा स्वभावातून अनेक युवकांचे संघटन केले  आहे 
 अनेक युवकांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांच्या हस्ते उद्घाटन करून आशीर्वाद घेत  आपल्या व्यवसायात प्रगती केल्याचे दिसून आले. 
इंदापूर परिसरात प्रसिद्ध उद्योजक राजाभाऊ इंगळे त्यांचे थोरले बंधू असून त्यांच्या साथीने ते युवकांना नवीन व्यवसायास सुवर्ण संधी मिळावी. त्यांनी नोकरी पेक्षा व्यवसायाकडे वळून आपल्या जीवनाची प्रगती करावी म्हणून गुलाबराव इंगळे पेठची स्थापना करून त्याठिकाणी सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी चालू आहे . अशा परिवारातील अमोलराज इंगळे हे व्यवसाय क्षेत्राबरोबर ही सामाजिक क्षेत्रात अनेक विविध उपक्रमातून आपले कार्य करीत आहेत.

तसेच गोरगरीब गरजू लोकांनाही ते प्रत्यक्ष मदत करतात. त्यांच्या या कार्याचा सर्व ठिकाणी सर्वसामान्य मध्ये नेहमी चर्चा पाहण्यास मिळते. राजकीय क्षेत्रात कोणताही पदभार नसताना संबंधातील राजकीय नेते यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये आपुलकीचे व विश्वासाचे स्थान मिळवून आपला राजकीय ठसा निर्माण केला आहे. त्याचा फायदा म्हणून वेगवेगळ्या निवडणुकीच्यावेळी त्यांचे उमेदवारीसाठी नेहमीच नाव चर्चेला येत असते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कोणाशीही वैर न ठेवता सर्वांशी आपुलकीच्या नात्याने वागणारे धडाडीचे युवा उत्तुंग नेतृत्व म्हणजेच अमोलराजे इंगळे होय. त्यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवडणे त्यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्ष अंकिताताई पाटील- ठाकरे तसेच युवा नेतृत्व राजवर्धन पाटील  यांच्याबरोबर आतापर्यंत राहिलेल्या एकनिष्ठ व  निष्ठेचे त्यांना मिळालेले फळ आहे.
close