श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरातील आदर्शनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते सम्यक फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास नरवडे यांची नवीन शोरूम पल्सर दुचाकी त्यांच्या घराच्या वॉल कंपाऊंडमघुन दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी रात्री चोरीस गेली असता त्याची तक्रार श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली होती. त्याअनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके व त्यांच्या पथकातील कॉन्स्टेबल राहुल नरोडे, गणेश गावडे, संभाजी खरात, गौतम लगड ,वसीम इनामदार, रमीज अत्तार यांनी युपीएसच्या माध्यमातून केवळ ८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यास जेरबंद केले,त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहरातील त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार व भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश सावंत यांच्या हस्ते श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व पोलिस पथकाचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सम्यक फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास नरवडे, भीम पॅंथर अध्यक्ष संजय वाहुळ, भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश सावंत, किरण साळवी, लक्ष्मण मोहन, संतोष त्रिभुवन ,श्रीकांत जमादार ,इमरान शहा, अमोल साळवे , विनोद शिरसाट सामाजिक इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके म्हणाले की, सर्वच नागरिकांनी आपल्या वाहनास युपीएस बसवून घेतल्यास चोरी गेलेल्या वाहनांना शोधण्याकामी मोठी मदत होईल आणि संबंधित आरोपींनाही तात्काळ जेरबंद करता येईल असे ते म्हणाले.
श्रीरामपूर शहर पोलिसांच्या अशा या उत्तम कामगिरी बद्दल शहर व परिसरात नागरिकांमधून समाधान व्यक्त केला जात आहे.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

