shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर व्हावे यासाठी आमदार अभिमन्यूजी पवार यांना निवेदन...!

लातूर:-

मंगळवार दिनांक 5 डिसेंबर  2023 रोजी वडार समाजाचे नेते पिराजी मामा मंजूळे , भाजपचे कार्यशील मा. नगरसेवक नितीनभाऊ वाघमारे, शिवक्रांती वडार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष श्री रवी शिंदे , प्रदेश सचिव श्री अनिल शेलार, प्रदेश उपाध्यक्ष श्री बलराजअण्णा वारकर आणि प्रदेश कोशाध्यक्ष श्री राजू जाधव , शिवक्रांती वडार फाऊंडेशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष श्री बाबान्ना कुशालकर, शिर्डी एक्सप्रेस वृत्तपत्राचे  चे संपादक श्री रमेश जेठे, वडार समाजातील ज्येष्ठ अभ्यासु व्यक्तिमत्व श्री गोरखनाथ कुऱ्हाडे (राहुरी) आणि सर्व इतर पदाधिकारी, सदस्य यांनी लातुर मधील मेळाव्यातील २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यानी मान्य केलेल्या मागण्या व ह्याच मेळाव्याद्वारे निघालेल्या २०१७  च्या शासन निर्णयानुसार वडार समाजाला जातीचे दाखले मिळावेत, या *वडार समाजाच्या मागण्या औसा विधानसभेचे आमदार श्री अभिमन्यूजी पवार यांनी २०२३ च्या होणाऱ्या नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात मांडण्याकरिता निवेदन देण्यात आले.



 याप्रसंगी शिवक्रांती वडार फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्यासमोर वडार समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडले व ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. याला अतिशय उत्तम प्रतिसाद देत औसा विधानसभेचे आमदार श्री अभिमन्यू पवार यांनी लवकरात लवकर वडार समाजाचे सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. "आमदार अभिमन्यू पवार हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी वडार समाजाचे सर्व प्रश्न समजावून घेतलेले आहेत म्हणून वडार समाजातील सर्व तळागाळातील  व्यक्ती आमदार श्री अभिमन्यूजी पवार यांना मानतो, वडार समाजासाठी तारणहार असणारी व्यक्ती म्हणजे आमदार अभिमन्यूजी पवार  आहेत" अशी प्रतिक्रिया शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री रवी शिंदे  यांनी दिली.
 "शिवक्रांती वडार फाउंडेशन चे हे  समाजहितोपयोगी कार्य असेच चालू राहील आणि जोपर्यंत वडार समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही" अशी प्रतिक्रिया *शिवक्रांती वडार फाउंडेशनचे प्रदेश सचिव  श्री अनिल शेलार  यांनी दिली.

 "महाराष्ट्रातील होणारी हिवाळी अधिवेशन हे अतिशय महत्त्वाचे अधिवेशन असून त्यामध्ये वडार समाजाच्या समस्या विषयी चर्चा व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे अशी प्रतिक्रिया शिवक्रांती वडार फौंडेशन चे प्रदेश उपाध्यक्ष श्री बलराज अण्णा वारकर यांनी दिले.
close