कामगारांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मन भरून आलं : हर्षवर्धन पाटील
वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील कामगारांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार संपन्न
इंदापूर :
नुकताच वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत मा. कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. जेव्हा या कामगारांचे आंदोलन सुरू होते, तेव्हाच त्यांना शब्द दिलेला की आता प्रश्न मार्गी लावूनच तुमच्याकडे येणार. यामुळे हा शब्द खरा ठरवल्याचा आणि कामगारांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मन भरून आलं, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी (दि.१४ जाने. )कामगारांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केले.
यावेळी उपसरपंच संजय नकाते यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कामगारांचा ४२ दिवस संप झाला त्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आणि कामगार मंत्र्यांच्या सोबत तो प्रश्न मार्गी लावला. १९८५ साली शंकराव पाटील भाऊ यांनी मदत केली. तसेच कामगारांसाठी हर्षवर्धन पाटील यांनी मदत केली . कायम समाज उपयोगासाठी काम करणारे हर्षवर्धन पाटील असल्याची उद्गार त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील संपामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मध्यस्थी करून राज्याचे कामगार मंत्री मा. सुरेश खाडे यांच्या समवेत बैठक लावून कामगारांचे प्रश्न मिटवला. त्याबद्दल कामगारांच्या वतीने आज हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित राहत हर्षवर्धन पाटील यांनी सत्काराचा स्वीकार करत व कामगार बंधू यांच्या समवेत संवाद साधला.
जे कामगार आपल्या वालचंदनगरचे नाव सातासमुद्रापार घेऊन जात आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावू नये, हीच खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यांचा प्रश्न मार्गी लागतोय याचं मोठं समाधान आहे. येणाऱ्या काळात त्यांना कसलाच संघर्ष करावा लागणार नाही. यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. या कामगारांच्या चेहेऱ्यांना आज जो आनंद आणि समाधान दिसलं, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांचा लढा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. आता त्यांचा संघर्ष थांबला असून आता देशाच्या अनेक मोहिमांमध्ये आपल्या कंपनीचे नाव पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी आय एम डी समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल पाटील, सेक्रेटरी शहाजी डबडे, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष राहुल बावडेकर, ग्रामपंचायतचे सरपंच कुमार गायकवाड उपसरपंच संजय नकाते इतर मान्यवर व अनेक कामगार उपस्थित होते.
याप्रसंगी विश्वजीत तावरे, दयानंद झेंडे, काका पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन शहाजी दबडे यांनी केले तर आभार आप्पा क्षीरसागर यांनी मांनले.

