रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने बावडा येथे कृषी सल्ला केंद्र.
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा बावडा: - महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने दि. १३ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालय बावडा येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर .जी. नलावडे, प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), प्रा. सौ एच .व्ही .कल्याणी (कार्यक्रम अधिकारी )यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी राजेंद्र गिरमे यांनी सेंद्रिय शेती, सौ अंजली जगताप यांनी कृषी योजना व अमोल शेंडगे यांनी सेंद्रिय शेती या विषयांवर तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सरपंच सौ पल्लवी गिरमे यांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच प्रास्ताविक जयश शिंदे यांनी केले व आभार आकाश माने यांनी केले.
कार्यक्रमासाठी बावडा परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी व कृषी तज्ञ सुधीर पाटील मा. सचिव श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, राजेंद्र सूर्यवंशी खजिनदार, रणजीत घोगरे उपसरपंच, महादेव घाडगे मा. संचालक सहकार महर्षी , अमर फडतरे तालुका कृषी अधिकारी संतोष सूर्यवंशी ग्रा.पं.सदस्य, विराजसिंह मोहिते प्रा. कृषी तंत्र महाविद्यालय बावडा. प्रा. ए बी तमनर व प्रा. सौ एस व्ही तरंगे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जगताप जी जे व जयश शिंदे यांनी केले.

