shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन अर्ज प्रक्रीया सुरू


 अहमदनगर प्रतिनिधी:
भारत सरकार शिष्यवृत्ती सन २०२३-२४ या वर्षासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इ. योजनांचे नवीन चे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ ११ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेले आहे.


इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती  व विशेष मागास प्रवर्गातील  प्रवर्गातील विदयार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत. ऑनलाईन अर्ज भरल्याची प्रत महाविदयालयामध्ये सादर करण्याचे आवाहन  इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे सहायक संचालक राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close