shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नमो चषक अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचे आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते उद्घाटन!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                           232 केज विधानसभा मतदारसंघ* *नमो चषक* अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांचे खो खो स्पर्धा , खुल्या कब्बडी स्पर्धा, शालेय कब्बडी स्पर्धा चे उद्घाटन मॉडर्न इंग्लिश स्कूल, बीड रोड केज येथे *केज मतदारसंघाच्या लोकप्रिय आ. नमिता अक्षय मुंदडा* यांच्या हस्ते झाले. या मध्ये कब्बडी खेळात 36 संघानी सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखविले, तसेच खो खो स्पर्धा मध्ये 16 संघानी सहभाग घेतला. 


या संघानी मोठ्या प्रमाणात बक्षीसे जिंकून उपस्थित मान्यवरांची व क्रीडा प्रेमीची मने जिंकली. या प्रसंगी जुन्या काळात विविध स्पर्धा मध्ये आपले नाव लौकिक केलेल्या खेळाडूचा हृदय सत्कार *आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन समनवयक डॉ वासुदेव नेहरकर, क्रीडा संयोजक विनोद गुंड, भा. अध्यक्ष भगवान केदार, प्रकाश मुंडे, शिवराम घुले सर, सुरेश नांदे सर यांनी केले होते. या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.  तहसीलदार जगताप साहेब,केज विधानसभा प्रमुख शरद  इंगळे, महादेव अण्णा सुर्यवंशी, राहुल गदळे, लिंबराज फरके, शिवाजी पाटील, सुनील घोळवे, सुनील आबा गलांडे, विजय वनवे, विकास गवळी सर, दत्ता सावंत, गटशिक्षणाधिकारी साहेब,खदिर खुरेशी, निरंजन बोबडे , इश्वर बिक्कड, विक्रम डोईफोडे, चंदू मिसाळ व विविध गावचे सरपंच तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी केज च्या *आ. नमिता अक्षय मुंदडा* यांनी मनोगत व्यक्त केले. एक वर्षात केजला भव्य दिव्य असे क्रिडा संकुल उभारले जाणार आहे. यात कब्बडी आणि खो खो साठी रबर युक्त टर्फचा वापर केला जाईल. तसेच विविध खेळाच्या मैदानाचा यात सहभाग असेल व हे काम क्वालिटी मध्ये कसलिही तडजोड न करता केले जाईल असे आश्वासन या प्रसंगी त्यांनी दिले. आ. नमिता अक्षय मुंदडा या स्वतः लॉन टेनिस च्या  आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. हे हि विशेष. देशाचे *पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंञी अजीत पवार,लोकनेत्या पंकजा मुंडे,खा.प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून या सर्व गोष्टींचा विकास केला जाईल असे *आ. नमिता अक्षय मुंदडा* यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी खेळाडूंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.            
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजप तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी मानले.
close