shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यानिकेतन एक उपक्रमशील शाळा - डॉ.माणिक शेवाळे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. माणिक शेवाळे (चेअरमन,जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, संगमनेर) होते, तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. 

या चालू शैक्षणिक वर्षी 'जीवनसार' या विषयावर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. प्रसंगी इ.नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी वाढत्या वयानुसार कृष्णलीलेवर आधारित मानवी जीवनाच्या विविध रंगछटा उलगडून दाखविल्या. या संकल्पनांच्या आधारे नृत्यविष्कारांतून सांस्कृतिक रंगमंच गाजवला. विद्यार्थ्यांचे मनोवेधक नृत्य व  कथ्थक सादरीकरणाने रसिक -प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान बदलत्या जीवनशैलीवर प्रकाशझोत टाकण्यात आला. विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील समतोलाचे महत्व समजले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी शालेय वार्षिक अहवालाचे वाचन केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चि.साईराज थोरात (इ.नववी) व कु.निष्का राठी (इ.दहावी) यांना 'स्टुडन्ट ऑफ द ईयर' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शालेय वार्षिक पुस्तिका- मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले. शेवटी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मान्यवरांनी 'विद्यानिकेतन एक उपक्रमशील शाळा असल्याचे गौरवोद्गार काढले. 

कार्यक्रमास डॉ. राहुल शेवाळे (इंटरव्हेनशनल कार्डिओलॉजिस्ट संगमनेर), व्हा. चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, डॉ.अर्चना शेळके, मंगलाताई आढाव, संजयभाई शहा, रोहित शिंदे, रश्मी शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, रंजना जरे, योगेश गायकवाड, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे, अमित त्रिभुवन, कार्यालयीन अधिक्षक सतिश थोरात, रावसाहेब राशिनकर, शिक्षक- पालक सदस्य, विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या भारती कुदळे, सूत्रसंचालन सुजित दुशिंग, गायत्री तांबे यांनी केले, तर आभार सुजित दुशिंग यांनी मानले.

पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close