श्रीरामपूर प्रतिनिधी:
बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांचे सामाजिक कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील गडाख यांनी व्यक्त केले.
अमळनेर ( ता..नेवासा) येथील हनुमान मंदिर सभा मंडपात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमळनेर येथील हनुमान भक्त ज्योतिष शास्त्रतज्ञ बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार मिळाल्याने त्यांचा अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते अमळनेर येथे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर आयनर, उपसरपंच अशोक मोरे, पोलीस पाटील अनिल माकोणे, मुळा कारखान्याचे संचालक कर्णासाहेब पवार, सोपान सुपनर, नेवासा बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब माकोणे यांच्यासह अमळनेर येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

