shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरसगांवला वेळोवेळी पूर्ण सहकार्य राहील - पो.निरीक्षक नितीन देशमुख

पोलीस निरीक्षक देशमुख यांची शिरसगांव तंटामुक्ती बैठकीस उपस्थिती, ग्रामपंचायतकडून श्री.देशमुख यांचा सत्कार

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची पहिलीच बैठक नव्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच अशोकराव पवार व उपाध्यक्षपदी अशोकराव गवारे यांची निवड झाली.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचा शिरसगांव ग्रामपंचायतवतीने सत्कार करण्यात आला.देशमुख यांच्या हस्ते तंटामुक्ती समिती सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गणेशराव मुदगुले यांनी मागील आढावा सांगितला.व गाव तंटामुक्त करून पारितोषिक मिळविलेले आहे.यापुढे जास्तीत जास्त काही वाद निर्माण झाल्यास ते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला न जाता गावातच मिटविले जातील अशी ग्वाही दिली.या कामी पोलीस विभागाने सहकार्य करावे असे सुचविले.
सत्काराला उत्तर देताना पो.नि. नितीन देशमुख म्हणाले की, ग्रामस्थांनी मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार.व शिरसगांवला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी गणेशराव मुदगुले,माजी तहसीलदार गुलाबराव पादीर, गटविकास अधिकारी शामराव पूरनाळे,सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रामसेवक पी डी दर्शने,सर्व ग्रा.प.सदस्य,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close