shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपरगाव तहसिल कार्यालयात जप्त वाहनांचा ९ जानेवारी रोजी लिलाव; इच्छुकांनी लिलावात सहभाग नोंदविण्याचे आवाहन


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
कोपरगाव तालुक्यात वाळु चोरी विरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. पंरतु वाहन मालकांनी दंडात्मक रक्कम शासन जमा न केल्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांचा लिलाव ९ जानेवारी २०२४ रोजी काळी ११ वाजता तहसिल कार्यालय, कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.


ईच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात अधिकाधिक संख्येने भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेले वाहने, लिलावात हातची किंमत आदीबाबतची माहिती तहसिल कार्यालय, कोपरगाव येथील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे तहसिलदार संदीपकुमार भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्‌वारे कळविले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close