*रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरू करा -माजी चेअरमन सोपानराव राऊत
श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.श्रीरामपूर पंचायत समिती माजी सभापती प्रा.डॉ. सुनिताताई गायकवाड यांना पीएचडी प्रदान झाल्याने तसेच श्रीरामपूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सौरभ गदिया यांना मिस्टर इंडिया पुरस्कार प्राप्त झाल्याने सोसायटीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच रेल्वे प्रशासन सल्लागारपदी माळवाडगाव येथील बबनराव मुठे यांची निवड झाली तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. तुषार चौदंते, ॲड. तात्या दासरजोगी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन शरद देवकर यांनी केले प्रसंगी प्रा.डॉ. सुनिताताई गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत निपाणी वडगाव तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ माझ्या पाठीमागे सदैव माहेरच्या आपुलकीने उभे राहिले. सर्वांच्या पुढाकारातून आशीर्वादाने पीएचडी पदवी प्राप्त करण्यात यश मिळाले यापुढेही सदैव सहकार्य करा असे प्रतिपादन केले.
ॲड. सौरभ गादिया यांनी मनोगत व्यक्त करताना मी श्रीरामपूरकर असल्याचा अभिमान आहे तसेच आपण माझा सन्मान केला याबद्दल सर्वांचा ऋणी राहील असे मत व्यक्त केले तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराज देवकर यांनी सर्व सत्कारमूर्ती यांना शुभेच्छा व्यक्त केल्या, रेल्वे प्रशासन मार्गदर्शक पदी निवड झालेले बबनराव मुठे यांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत निपाणी वडगाव या ठिकाणी पूर्वीचे रेल्वे स्टेशन सोपानराव राऊत यांच्या विनंतीवरून पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करू तसेच रेल्वे प्रशासनाची तात्काळ प्रश्न उपस्थित करून अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आयोजक विविध कार्यकारी सोसायटी सर्व पदाधिकारी तसेच अशोक सहकारी साखर कारखाना संचालक सोपानराव राऊत यांनी कार्यक्रमाचे आयोजन करत मान्यवरांचा सन्मान केला तसेच निपाणी वडगाव येथील रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरू करा अशी मागणी केली, जेणेकरून या ठिकाणी प्रवासी शाळा कॉलेज विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने ये जा करत असतात तसेच ऊसतोड कामगार शासकीय कर्मचारी यांना निपाणी वडगाव रेल्वे स्टेशन सोयीचे जात असल्याने याच ठिकाणी पूर्ववत रेल्वे स्टेशन सुरू करावे अशी विनंती रेल्वे प्रशासन नुतन सल्लागार श्री बबनराव मुठे यांच्याकडे केली.
या कार्यक्रमासाठी सर्वश्री भिमराज देवकर, सगाजी राऊत दादासाहेब राऊत, विश्वासराव भोसले ,कारभारी शिंदे, शिवाजी गायके, भाऊसाहेब गायधने, सूर्यभान गायधने, भाऊसाहेब दौंड, शिवाजी दौंड, अनिल उंडे, अशोक बोरुडे, पारधे ताई, हौशीराम राऊत,संभाजी देवकर, राजु खातिब,रवींद्र गायधने, अंबादास जाधव, तारूभाई शेख, सुखदेव साळवे, सालच्या लोखंडे, भाऊसाहेब देसाई, एकनाथ राऊत, विजय राऊत, राजेंद्र पवार, रावसाहेब दौंड, उत्तम देवकर, राजेंद्र राऊत,भागिनाथ राऊत,गणेश भोसले, हमिद शेख, बाजीराव राऊत, चंद्रकांत खाडे, चंद्रकांत गोराणे, वसंत राऊत, तसेच निपाणी वडगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक,कर्मचारी वृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अशोक सहकारी साखर कारखाना संचालक सोपानराव राऊत यांनी मानले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

