बावडा येथे किसान सार्वजनिक वाचनालयचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर: दि. १८ जानेवारी २०२४ रोजी बावडा बाजार तळ(ता. इंदापूर) या ठिकाणी किसान सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलित करून पार पडले.
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सार्वजनिक वाचनालय याचे नाव शेतकरी बळीराजाचे म्हणजे किसान नाव देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केले असल्याने अध्यक्ष पंडितराव पाटील यांचे कौतुक केले . शेतकरी सुखी तर जग सुखी अशा म्हनी प्रमाणे पंडितराव पाटील यांनी नाव दिल्याबद्दल टाळ्यांच्या कडकडाटाता आभार मानले. आठ ते दहा दिवसात पुस्तकांसाठी पन्नास हजार रुपयांचा निधी ताबडतोब मंजूर केला जाईल. तसेच वाचनालयाची जागा उपलब्ध झाल्यानंतर इमारतीची जबाबदारी घेऊन आश्वासित केले . बावड्याच्या विकासासाठी जो काही निधी लागेल तो निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द यावेळी त्यांनी दिला.
तसेच आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, किसान सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचनाचा छंद असणाऱ्यांसाठी व निवृत्त आणि जेष्ठांसाठी व्यासपीठ तयार झाले असून त्यासाठी सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती प्रशांत पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, आजच्या काळामध्ये वाचनालयाची फार गरज आहे कै. शंकरराव पाटील भाऊ असताना वाचनालय चालू केले होते. त्याचे नियोजन कांबळे भाऊ करत होते. त्यानंतर वाचनालय बंद झाले. त्यामुळे वयस्कर मंडळी वाचक अभ्यासू असतील त्यांचे येणे जाणे बंद झाले म्हणून पंडितराव पाटील यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन करून ती गरज पूर्ण केली त्याबाबत त्यांचे आभार अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी खरेदी-विक्री संघाचे नूतन चेअरमन प्रताप पालवे, व्हाईस चेअरमन विजय घोगरे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे नवनियुक्त सदस्य धनंजय देशमुख तसेच प्रगतशील शेतकरी राजकुमार भोसले, अमर भोसले, आशिष शेंडे, राजेंद्र घोगरे, सुभाष आगलावे, विजय नायकुडे,ग्रामपंचायत सदस्य महादेव गाडगे, विक्रम घोगरे, मनीषा जाधव ,सविता साबळे ,अश्विनी कांबळे ,वकील वस्तीचे सरपंच वनिता भोसले ,सदस्य शितल भोसले, शहाजहान शेख, रोहन कोळेकर ,वर्षा धुमाळ, विजया सरोदे, पत्रकार दीपक शिंदे, शौकत तांबोळी, राकेश कांबळे, गणेश कांबळे, इत्यादींचा सन्मान यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, युवक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष संग्राम पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुकाराम घोगरे, सतीश घोगरे, विजय गायकवाड, सुरेश शिंदे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी केले .यावेळी मनोगत धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन अजित टिळेकर व आभार महादेव घाडगे यांनी मांनले.

