उद्या शेटफळ हवेलीत २५ कोटी ८ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन समारंभ .
माजी राज्यमंत्री तथा आ.दत्तात्रय भरणे यांची उद्या होणार जाहीर सभा .
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून २५ कोटी ८ लक्ष निधीच्या विविध विकास कामाची भूमिपूजन व उद्घाटन समारंभ व जाहीर सभेचे आयोजन शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गटाचे)अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माजी सभापती प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले ,ज्येष्ठ नेते दशरथ डोंगरे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, महिला अध्यक्षा साधनाताई केकान, सरपंच बाबुराव शेंडे ,माजी सरपंच हेमंत पाटील, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर ,ज्येष्ठ नेते साहेबराव मोहिते ,उपाध्यक्ष शिवाजी तरंगे, ज्येष्ठ नेते हनुमंत तोबरे, वडापुरी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, ज्येष्ठ नेते दादा पाटील ठवरे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे ,ज्येष्ठ नेते श्रीकांत बोडके, ज्येष्ठ नेते तानाजी देवकर, शहाजी पाटील, तुकाराम घोगरे, देविदास निंबाळकर, सचिन देवकर, बाळासो भोसले ,रमेश कोरटकर ,सोमेश्वर वाघमोडे, शिवाजी हंगे ,समाधान जानकर, उदय घोगरे ,श्रीकांत दंडवते ,राजू जगताप ,पंजाबराव भगत, सतीश गंगावणे कालिदास राऊत सर समाधान बोडके इत्यादींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेटफळ हवेली, सरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.
विशेष बाब म्हणजे शेटफळ हवेली ते बावडा (बोकडदरा ते शेटफळ हवेली) हा रस्ता हरदारीचा व दोन मुख्य गावांना जोडणारा रस्ता भारत देश स्वतंत्र झाल्यापासून डांबरीकरणापासून वंचित राहिला होता आता या सुद्धा रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे गावकरी आनंदीत आहेत. व या "शापित" रस्त्यापासून आपली सुटका होईल अशाच गावकऱ्यांचा अपेक्षा आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी याच गावात चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्याची अवस्था ही दयनीय होती. परंतु बावडा रस्ता सोडला तर सर्व बाजूंचे रस्ते आता अद्यावत होऊन दळणवळण सोपे झाले आहे.
शनिवारी 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता याच गावामध्ये विविध कामांचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे या गावात जाहीर सभाही होणार आहे आणि या जाहीर सभेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे काय बोलणार? याकडे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सद्यस्थितीत खालील प्रमाणे निधीचे नियोजन झालेले आहे व माध्यमातून कामे प्रगतीपथावर आहेत.
शेटफळ हवेली ते बावडा रस्ता (6 कोटी 8 लक्ष)
वडापुरी ते शेटफळ हवेली ते लाखेवाडी रस्ता (17 कोटी)
शेटफळ हवेली (तळेवाडी रस्ता) (20 लाख)
शेटफळ हवेली गारपिर (सावंत वस्ती रस्ता) (20 लाख)
शेटफळ हवेली रानमळा रस्ता (7 लाख)
शेटफळ हवेली जगताप मळा रस्ता (7 लाख)
शेटफळ हवेली सुतार वस्ती अंतर्गत रस्ता (10 लाख)
तळेवाडी भोसले वस्ती अंतर्गत रस्ते व हायमास्ट दिवे (15 लाख)
शेटफळ हवेली गावअंतर्गत बंदिस्त गटारी (10 लाख)
शेटफळ हवेली आंबेडकर उद्यान (20 लाख)
आंबेडकर नगर चव्हाण वस्ती अंतर्गत रस्ते व हायमास्ट (20) लाख)
शेटफळ हवेली भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण (10 लाख)
संत बाळूमामा मंदिर (निरगुडेवस्ती) सभा मंडप ( 15 लाख)
अंगणवाडी इमारत शेटफळ हवेली (11 लाख )
माध्यमिक विध्यालय शे. हवेली इमारती साठी (15 लाख)
शेटफळ हवेली स्मशाण भूमी सुशोभीकरण ( 20 लाख)

