shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वेदना

मी आहे ईथे, उद्या असणार नाही!
हसतच चालतो, मी रडणार नाही!

पडलो मी रक्ताळलो भेगाळलो जळालो कितीदा!
घडलो असा कि, परत घडणार नाही!

काढले आलाप राग भाव मनी अंतरीचे!
जुडलो असा कि, मी मोडणार नाही!

अडले का कधी कुणाचे संत महंत आले गेले!
माणुस जात, तथागतांची वाट सोडणार नाही!

लिहीले किती मी वेदणा, प्रसुत शब्दांची!
महासुर्या मुक्तीदात्या, तुझे उपकार विसरणार नाही!

झेपावलोय सप्तरंगी बहुरंगी चंदेरी स्वप्नांकडे!
उमगले जे अंतरी, पटलावर दावल्या शिवाय जाणार नाही!

मी आहे ईथे, उद्या असणार नाही!
हसतच चालतो, मी रडणार नाही!
आकाश सुपारे!
9822510254
close