shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेेतील मुलांनी अनुभवली प्रत्यक्ष निवडणूक

गौराईमळा शाळेेतील मुलांनी अनुभवली प्रत्यक्ष निवडणूक

 इंदापूर :  जि. प.प्राथ शाळा गौराईमळा शाळेतील मुलांच्या  शालेय मंत्रीमंडळाची निवडणूक घेण्यात आली . त्या मध्ये लोकशाहीची मुल्य मुलांना माहिती व्हावी तसेच सर्व निवडणुक प्रक्रियाची माहिती व्हावी  या उद्देशाने ही निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली.त्या मध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीन उमेदवार उभे राहिले. प्रत्यक्ष एकुण २८ मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला. त्या मध्ये सोहम शिंगाडे  २० ,मते संस्कृती शिंगाडे ४, आयान शेख ४ या पद्धतीने मतदान झाले.त्या मध्ये निवडणुक अधिकारी प्रसाद जाधव व हर्षल जाधव यांनी काम पाहिले. शेवटी मतमोजणी करुन सोहम  शिंगाडे याला विजयी  घोषित करण्यात आले. 

                
भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे निवडणुक प्रक्रिया व तिची मुल्ये बालमनात रुजावित म्हणुन  ही प्रक्रिया राबविण्यात आली.
             
मुख्याध्यापक प्रताप शिरसट यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच सर्व मतदारांचे आभार  विजयी उमेदवारांनी मानले.  

उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया संपन्न झाली.
close