प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
मागील अनेक महिन्यापासून चालू असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा वाद हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर चालू बुधवारी निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागल्यामुळे केज शहरात फटाके वाजवून आनंद साजरा केला यावेळी बालु पवार किसन कदम यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते
शिवसेनेचे मागील काही महिन्यापासून आमदार आपात्रतेचा कायदेशीर लढा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर लढला जात होता याचा निकाल बुधवार १० जानेवारी रोजी अध्यक्ष यांनी दिला यामध्ये एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या आमदाराना काढण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांना नसल्याचे नमुद करत २०१८ च्या शिवसेनेच्या घटनेचा नुसार हा निकाल दिला असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले . निकाल जाहीर केल्यानंतर केज शहरात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला
माजी जि प सदस्य किसन कदम , शहर प्रमुख बालासाहेब पवार, उप.तालुका प्रमुख महेंद्र चाटे, जाधव विनोद, ठोके आण्णा, सय्यद दस्तगीर, आमोल पवार, मंगेश पवार ,पोपळे, यूवा नेते मनोज पवार व ईतर शिवसैनीक उपस्थित होते .



