अहमदनगर प्रतिनिधी: तहसिलदार नगर या कार्यालयाच्या अधिनस्त जप्त मुद्देमाल गहू, तांदूळ, मका, साखर, हरभरा, मात्रा धान्य लिलाव शासकीय अन्नधान्य गोदाम (पाच गोडावुन) केडगांव ता. अहमदनगर येथे दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता करण्यात येत आहे.
या लिलावात सहभागी होणेकरीता अनामत रक्कम ५०००/- भरणे बंधनकारक राहील. लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहावयास मिळतील. तसेच लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पुर्ण अधिकार कार्यालयाने राखुन ठेवलेला आहे. सर्व नागरिकांना कळविणेत येते की, सदर लिलावात सहभाग घेणेकरीता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैधपरवानाधारक यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार नगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

