श्रीरामपूर प्रतिनिधी:
भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या पुणे येथील चौथ्या वर्धापन दिनी संस्थेच्या राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी
श्रीरामपूर (शिरसगांव) येथील ज्येष्ठ तथा अभ्यासू पत्रकार बी.आर. चेडे यांची नियुक्ती संस्थापक प्रा. कैलास पवार यांनी केली. नियुक्तीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
श्री.चेडे हे जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारीता करत आहेत,त्यांच्या पत्रकारीतेने आजवर अनेकांना उचित न्याय मिळवून दिला आहे, कृषी, सहकार,साहित्य, आध्यात्मिक या सोबतच विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण पत्रकारीतेसाठी ते जिल्हाभरात सर्वांना सुपरिचित आहेत. यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
*पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

