श्रीरामपूर प्रतिनिधी:
ॲनिमेशन ही कला आहे ते डिजिटल फुटेजचे तुकडे असतात असे प्रतिपादन ॲनिमेशन तज्ज्ञ शुभांगी ब्राम्हणे यांनी केले.
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .गुंफा कोकाटे या होत्या.
यावेळी बोलताना शुभांगी ब्राम्हणे पुढे असेही म्हणाल्या की, मल्टीमीडिया प्रोजेक्ट मध्ये वापरण्यासाठी ऑडिओ सह एकत्र केले जातात. मोशन ग्राफिक्स सामान्यतः इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित केले जातात परंतु ते मॅन्युअल समर्थित तंत्रज्ञानाद्वारे देखील प्रदर्शित केले जाऊ शकते. विविध प्रकारचे ग्राफिक्स असतात. प्रायोगिक ॲनिमेशनच्या कोणत्याही स्वरूपाला ॲनिमेशन म्हटले जाऊ शकते.ॲनिमेशनच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत.व्हिडिओ, चित्रपट, टीव्ही आणि परस्पर संवादी अनुप्रयोगांसाठी ॲनिमेशन अतिशय उपयोगाचे आहे असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी प्रताप राठोड यांनीही विद्यार्थ्यांना ग्राफिक्सबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता गायकवाड यांनी केले. प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले प्रा. डॉ.विठ्ठल सदाफुले आणि रुपेश सिकची सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.या कार्यशाळेसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

