*इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने शिक्षक, विदयार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा*
इंदापूर:- इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने हिंदी निबंध प्रतियोगिता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
इंदापूर तहसील हिंदी अध्यापक यांच्यावतीने दिनांक 14 सप्टेंबर रोजी हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी यांचे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच यावेळी हिंदी विषयाचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी तसेच सेवानिवृत्त हिंदी शिक्षक गुणगौरव सोहळा 20 जानेवारी शनिवार रोजी दुपारी बारा वाजता केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे असे हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सर्जेराव रणमोडे यांनी सांगितले आहे.
यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच हिंदी विषयात आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री ता.का. सूर्यवंशी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ तसेच प्रमुख पाहुणे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर पुणे विभाग शिक्षक मतदार संघ यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारामध्ये दत्तात्रय काशिनाथ गवळी, श्री हनुमान विद्यालय अवसरी, स्वाती सुहास पुकळे श्री कोटेश्वर विद्यालय काटी, अभिमन्यू अर्जुन चव्हाण कर्मवीर शंकरराव पाटील विद्यालय कुरवली, शंकर मुरलीधर काटकर हिराबाई देसाई विद्यालय बेलवाडी, दीपा भानुदास माने श्री हरणेश्वर विद्यालय कळस, रवींद्र श्रीरंग सपकाळ उदमाई विद्यालय उदमाई वाडी तसेच सेवानिवृत्त हिंदी शिक्षकांचाही सन्मान केला जाणार आहे असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळ सदस्य उस्मान मुलांनी सर तसेच हिंदी तहसील संघ उपाध्यक्ष विद्या भागवत, कार्याध्यक्ष संजीव कुमार पांढरे, सचिव के.डी भोंग, जिल्हा समन्वयक एस एन भोंग, महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळ सदस्य यु.जे. मुलांनी, सल्लागार सी. एस. सोळसे, मचाले सर, भोसले सर, चव्हाण सर, शेंडे सर, मुलानी सर, गाढवे सर, गायकवाड सर, श्री वाघ सर व सर्व हिंदी प्रेमी उपस्थित राहणार आहेत.

