महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी दर्शविले विविध गुणदर्शन.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले विद्यालय बिजवडी महात्मा फुलेनगर चे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन दर्शवले.
बिजवडी येथील महात्मा फुले विद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे सचिव मनोहर चौधरी, संचालक विलासराव वाघमोडे, एडवोकेट कोठारी, कर्मयोगी कारखान्याचे संचालक छगन भोगळे मच्छिंद्र अभंग ,छगन बोराटे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बंडगर साहेब शाळा व्यवस्थापन समतीचे अध्यक्ष कमाल सय्यद इत्यादी मान्यवर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी प्रथम विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालण्याचे काम झाले असून त्याची उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. यामध्ये कमाल सय्यद यांनी विद्यालयास १० लाख रुपयांच्या पत्रा शेड बांधून दिले. निवृत्त पोलीस अधिकारी बंडगर यांनी वॉटर फिल्टर बसवून दिला .जिल्हा परिषद सदस्य अंकिताताई पाटील - ठाकरे यांच्या माध्यमातून बंदिस्त व्यायाम शाळा साहित्य दिले. यावेळी या मान्यवरांचा आभारही मान्यता आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले तर अध्यक्ष निवड श्री.सुनील माळी यांनी तर आभार श्री. शंकर हुबाले सर यांनी मानले. यानंतर इयत्ता ५ ते १० वीतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय एकात्मता ,व्यसनाधीन समाज, स्त्री शक्ती इत्यादी विषयावरती आपल्या कला दर्शनातून जागृती घडवली. त्यास पालक वर्गातून बक्षीस रूपातून भरभरून दाद देण्यात आली.

