shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांचे सामूहिक सूर्यनमस्कार

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांचे सामूहिक सूर्यनमस्कार 
इंदापूर:- राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर सामुहिक सुर्यनमस्कार आणि योगाभ्यास करीत राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

पतंजली युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  योगशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.युवा भारत राज्यकमिटी सदस्य प्रशांत गिड्डे पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे राजेंद्र चव्हाण एनएसएस अधिकारी सुनिल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

योगशिबिरामध्ये युवक आणि युवतींना जिल्हा युवा प्रभारी अभिजीत देवकर तहसील प्रभारी सचिन पवार महिला प्रभारी सायराभाभी आतार यांनी योगाभ्यास प्राणायाम आणि  सामुहिक सूर्यनमस्काराचे धडे दिले.युवकांमध्ये स्वामी विवेकानंदांसारखी तेजस्विता येण्यासाठी मन आणि मनगट सशक्त होण्यासाठी व्यायाम आणि योगाभ्यासाचे महत्त्व असल्याचे मल्हारी घाडगे यांनी सांगितले तर स्वामी विवेकानंद आणि जिजाऊंच्या जीवन चरित्राविषयी राजेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. 

 या शिबिरामध्ये  सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी सुनिल मोरे गटनिदेशक अनिल सोनटक्के,धर्मराज सोनटक्के,रंगराव एकल, दत्तात्रय गावडे,सुधीर दोंड सर्व सीएचबी वर्ग,कार्यालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला

.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगराव  एकल यांनी केले  तर अनिल सोनटक्के यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
close