प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व मॉडेल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले.या कार्यक्रमाला कार्यक्रमालाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जोशी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बेडसकर साहेब गटशिक्षणाधिकारी केज यांच्या हस्ते संपन्न झाले .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्ताजी नाईकवाडे, संचालक माॅडेल इंग्लिश स्कूल श्री भोसले सर रोटरी क्लब अध्यक्ष केज, केंद्रप्रमुख श्री चौरे सर व देशमुख सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर प्रमुख पाहुण्याचासत्कार श्री विनोद गुंड सर क्रीडा संयोजक श्री.कुलकर्णी सर,श्री घुले सर गंलाडे मॅडम यांनी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद गुंड यांनी केले .या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन करताना श्री बेडसकर साहेब व श्री भोसले सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकवण व तत्वज्ञान विषयी माहिती सांगितली .या कार्यक्रमाला गायकवाड मॅडम, राजनंदिनी मॅडम सानिया ,मॅडम अनाम मॅडम प्रणिता मॅडम, घुले मॅडम, घोळवे मॅडम , बाहेती मॅडम, पवार मॅडम शाळेचे सर्व स्टाफ यांनी केेले.


