मी आमदारचं बरा लोकसभा अजिबात नको - आ.भरणे
इंदापूर:- या तालुक्याने मला आमदार केले. काल मी कुठेतरी वृत्तपत्रात बातमी वाचली,की दत्तात्रय भरणे हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत किंवा मैदानात उतरतील.परंतु मी आजही सांगतो मी खासदार व्हावं हे माझ्या आयुष्यात कधीही डोक्यात नाही. ज्या तालुक्याने मला मोठे केले, तुम्ही म्हणाला विधानसभा तेवढ्यापुरताचं माझं बर आहे. कशाला लोकसभा आणि काय करायचंय,कोणीतरी काहीतरी टाकतो बातम्यांचा काहीतरी घोळ करतो.तुमची सेवा हीच माझी सेवा आहे.ज्याला लोकसभेला राहायचे त्यांना राहू द्या आपल्याला त्यात पडायचं नाही. त्या गोष्टीत आपल्याला जायचं नाही. अशा शब्दात इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ कोटी ९२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले यानंतर कांदा गावात झालेल्या जाहीर सभेत भरणे बोलत होते.
तसेच भरणे म्हणाले की,मला काही समजत नाही कोण बातम्या लावतो काय लावतो तुम्ही म्हणाला तर तालुक्यातच तुमची सेवा करेल तुम्हाला माझा कंटाळा आला नाही ना आपला तालुकाचं बरा ! असं म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनी लोकसभेच्या चर्चेंना पूर्णविराम दिला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,सचिन सपकळ,दिपक जाधव, नवनाथ रुपनवर, संदेश देवकर,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, भागवत काटकर, पोपट शिंदे , अमर गाडे, सिताराम जानकर सतीश चित्राव,हनुमंत जमदाडे, दिलीप पाटील,रमेश शिंदे,बाळासाहेब व्यवहारे,शिवाजी तरंगे,मनोहर भोसले,विष्णू पाटील,यांसह कांदलगांव व तरडगांव ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गणेश बाबर पाटील, समाधान जगताप, सागर जगताप, सहदेव सरडे यांनी मनोगत व्यक्त करीत गावच्या समस्या आ.भरणे यांपुढे मांडत त्या सोडवण्याची मागणी केली. झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी ही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक वसंत आरडे यांनी केले तर आभार अँड.नितिन भोसले यांनी मानले.
भरणे पुढे म्हणाले की, कांदलगावात एवढी मोठी सभा मी कधीही अपेक्षित केली नव्हती.मी या तालुक्यात गेली आठ नऊ वर्षे झाले काम करतो आहे.काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा माणूस मी पाहिला नाही.कोणालाही उंबरे झिजवायला लावले नाहीत.स्वत:च्या खर्चाने गोरगरीब माणसाला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कामाला माणसे ठेवलीत. बांधकाम राज्यमंत्री असताना या तालुक्यात एक व्हीआयपी गेस्ट हाऊस आणि कामगारांच्या कॉर्टर साठी साडेसहा कोटी रुपये मंजूर केले. मात्र त्या कामाच्या भूमिपूजनाच्या फलकावर चुकून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव राहिले गेले मात्र त्याचे मोठे राजकारण झाले. आज तालुक्यात नऊ साडेनऊ वर्षात एवढा विकास आणला त्याचे पत्रकारांनी अभिनंदन करायला पाहिजे होते. तालुक्याला चांगल्या प्रकारच्या इमारती रस्ते आले मात्र कौतिक करायचे सोडून काही मंडळी गावात ज्यांना कुठल्याही प्रकारची किंमत नाही अशी माणसे कुठेतरी घोषणा करतात आणि त्याचे हेडिंग मात्र मोठे येतं असं म्हणत आमदार भरणे यांनी त्या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. आता या लोकांची आयडेंटिटी चेक केली पाहिजे, पाठीमागे ही लोकं कोण होती, यांनी काय काय उद्योग भानगडी केल्या आहेत अशा लोकांना आता खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे असंही भरणे यांनी म्हटलं आहे.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, या तालुक्यात जो विकास आमदार भरणेंच्या माध्यमातून झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यामुळे झाला.अजित पवार सत्तेत बसले बरोबर विकास पाहिजे तिथे आला. मामा आमदाराचे मंत्री झाले आणि काय चमत्कार घडला या तालुक्यातील वाडीवस्तीने पाहिला.बारामती इंदापूर हे वेगळे नाते आहे.दादांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर भविष्यात तुम्हाला यावे लागेल सत्य सांगावे लागेल. भावनेच्या आहारी जावून चालत नाही.कांदलगांव तरडगांव मधील काही फुटके पुढारी विरोध करतील मात्र ज्यांना विकास दिसतो ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतील,तरुण पिढीला रिझर्ट पाहिजे यासाठीच आम्ही अजित पवार यांना साथ दिली आहे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी अजित पवार यांनी त्यांना साथ दिली आहे कारण या देशाचा जगभर डंका कोणी केला असेल तर तो फक्त मोदींमुळे झाला हे नाकारता येणार नाही. विकास हा फक्त महाराष्ट्रामुळेच होत नाही त्याला दिल्लीची ही साथ लागते तेव्हा एवढ्या मोठ्या पध्दतीने विकास होऊ शकतो. यासाठी अजितदादांनी मोदींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला देखील तो विचार डोळ्यासमोर ठेऊन उद्याच्या लोकसभेला तुम्हा आम्हाला मतदान करावे लागेल.
----------------------------------------
आमदार भरणेकडून कोटींच्या निधीची घोषणा …
दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यानुसार आ.भरणे यांनी ओपन जीम पेव्हर ब्लाॅक साठी ५ लाख रुपये, बंधिस्त गटार लाईन साठी १० लाख रुपये, जोगेश्वरी मंदीर ते शंभुराजे चौक पर्यंत काँक्रेट रस्ता करण्यासाठी ५० लाख रुपये, दफणभुमी संरक्षक भिंत सुशोभिकरण २० लाख ,स्मशानभुमी संरक्षक भिंत सुशोभिकरण २० लाख, जोगेश्वरी मंदीर सभामंडप सुशोभिकरण १० लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.कांदलगांव ला चार बाजुने पाणी आहे याचा विचार करता भविष्यात या परिसरात पर्यटन विकास करावा अशी मागणी तरुणांनी केली होती यास ही भरणे यांनी समर्थन दर्शवले.

