shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा कि, अनेकांना त्याची कॉपी करण्याचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे- प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे

आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा कि, अनेकांना त्याची कॉपी करण्याचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे- प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे
इंदापूर;- शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भिगवणचे राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिर मौजे निरगुडे येथे दि.6 जानेवारी ते 13 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. "मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आजची तरुणाई" या विषयावरती प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते म्हणाले, मित्रांनो, मिनिटा मिनिटाला अन् तासा तासाला स्टेटस बदलून आयुष्याचं स्टेटस नाही बदलत. स्टेटस बदलण्यासाठी आयुष्यात खडतर कष्ट अन् खडतर अभ्यासच करावा लागतो. त्याच्या शिवाय स्टेट्स नाही बदलत.असे स्टेटस अनेक कर्तबगार महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केले.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्व व कर्तबगारीच्या जोरावरती अठरा पगड जातीधर्मीयांच्या सहकार्याने निर्माण केलेलं देखणं स्वराज्य.आजही जगभरातील अनेक अभ्यासक व संशोधकांना भुरळ पडते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची.छत्रपती शिवाजी महाराज्यांचे स्टेटस जगभरात ठेवले जाते. शिवजयंती जगभरात निर्माण केली जाते.हा जगतातील महान अशा आदर्शवत राजाचा आदर्श आजच्या तरुणाईने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
         शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रृत व विवेकी बनतो.
शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. क्रांतिसूर्य म. फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण तत्कालीन विद्यार्थ्यांना दिली. याचा आदर्श आजच्या तरुणाईने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.तरुणाईने रात्र रात्र जागून मोबाईलवरती दीड आणि दोन जीबी इंटरनेट खर्ची करण्याचा नादात आयुष्याचा जीबी तर खर्च होत नाही ना. याकडे गांभीर्याने पाहून मोबाईलच्या विळख्यातून सुटका करून घेतली पाहिजे. मोबाईलवर व्हाट्सअप वर याचे त्याचे स्टेटस टाकून कधीच स्वतःचं स्टेटस निर्माण होत नसतं. खडतर अभ्यास करून असं स्वतःचं स्टेट्स निर्माण करा कि, अनेकांना ते कॉपी करण्याचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे. असं कर्तृत्वाने स्टेटस निर्माण करा. असे आव्हान प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे यांनी विध्यार्थ्यांना केले.
      कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल बनसोडे यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले,आजच्या तरुणाईने मोबाईल पासून दूर राहावे. त्याचा अभ्यासा पुरता वापर करायला हवा.मोबाईल पाहण्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या असे आव्हान प्रा.अनिल बनसोडे यांनी विध्यार्थ्यांना केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थिनी कु.साक्षी टेंगले हिने केले. पाहुण्यांचा परिचय विध्यार्थीनी कु. स्नेहल गुणवरे हिने केले. तर आभार प्रा. दशरथ कुदळे यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्रा.आरती काळंगे, प्रा. प्रणाली शितोळे मॅडम उपस्थित होत्या.
close