shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्याच्या शेती पंपाला लागणाऱ्या विजेचा प्रश्न आज या ३३/ ११ केव्हीं विद्युत उपकेंद्रामुळे मिटला - आमदार दत्तात्रय भरणे.

झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्याच्या शेती पंपाला लागणाऱ्या विजेचा प्रश्न आज या ३३/ ११ केव्हीं विद्युत उपकेंद्रामुळे मिटला - आमदार दत्तात्रय भरणे.

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झगडेवाडी येथील 
३३/ ११ केव्हीं विद्युत उपकेंद्राचा उद्घाटन करून केला शुभारंभ.
इंदापूर: झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्याच्या शेती पंपाला लागणाऱ्या विजेचा प्रश्न आज या ३३/ ११ केव्हीं विद्युत उपकेंद्रामुळे मिटला अशा शब्दात  झगडेवाडी येथे ३३/ ११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले.
 
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले, बाळू करगळ,स्वातीताई शेंडे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, शिवाजी तरंगे, दिलीप पाटील, संदेश देवकर, नवनाथ रुपनवर,हमा पाटील, हनुमंत तोबरे,  साहेबराव मोहिते,  सरपंच अतुल झगडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 आमदार भरणे पुढे म्हणाले की,तुम्हा सर्व शेतकऱ्यांच्या विजेची गरज ओळखून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जातीपातीचा, गटातटाचा, पक्षाचा विचार केला नाही .आपल्या भागातील अडचण आणि गरज ओळखून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी, अतुल झगडे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला म्हणून आज आपण हे उपकेंद्र उभारू शकलो.या भागात एका एकरामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेणारे या उपकेंद्रावर असणारे शेतकरी आहेत. माझ्या शेतकऱ्याला शंभर वर्षे पुरेल इतके पाण्याची व्यवस्था केली पाहिजे म्हणून बावीस गावाच्या पाण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या माध्यमातून आपली ही योजना मार्गी लागेल आणि तो प्रश्न मार्गी लागल्यावरच तुम्हाला सांगणार आहे. झगडेवाडी, वरकुटे , पिटकेश्वर निमगाव केतकी या गावातील  शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे .तर वडापुरी, काटी ,निमगाव केतकी यांच्याकडील लोड कमी होणार आहे. महावितरणचे अध्यक्ष पद हे आमदाराला असते. ते पद हे अतुल झगडे यांच्याकडे कायम राहील ,अतुल फिरतो, झगडतो सर्वांना घेऊन काम करावे असाही सल्ला त्यांनी दिला.

यावेळी याप्रसंगी प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
---------------------------------------
चौकट: 

जे काम करतो, मरतो, झगडतो. तो बोलणारच. शेवटी काम करणाऱ्या माणसाला कोणालाही भीतीची कारण नाही - आमदार दत्तात्रय भरणे.

व्ही व्ही आय पी गेस्ट,  कर्मचाऱ्यांसाठी कॉर्टर आणले त्याचे तालुक्यातील लोकांनी स्वागत केले पाहिजे होते. चुकून नाव राहिले तर काही लोकांनी गोंधळ केला. खरं तर त्यांनी स्वागत केले पाहिजे होते. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. जे काम करतो, मरतो, झगडतो. तो बोलणारच. शेवटी काम करणाऱ्या माणसाला कोणालाही भीतीची कारण नाही. इथून पुढे भविष्यात जे करीन ते तुम्हा लोकांसाठी करीन. माझ्या इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी करीन आणि करीत राहीन .कोणाला पेपर मध्ये काय बातम्या छापायचे आहेत त्याने माझ्यासारख्या ला काही फरक पडणार नाही. तालुक्यातला गाव ,वाडी राहिली नाही की तेथे विकासासाठी निधी दिला नाही. वडापुरी ते अवसरी रस्ता राहिलेला आहे तो येणाऱ्या पंधरा दिवसाच्या ते मंजूर केले जाईल .जलजीवनच्या तालुक्याच्या आराखड्यावर आमदाराची सही असते. अभंग वस्तीच्या रस्त्यासाठी ३ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहे अशी माहिती मनोगत व्यक्त करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
close