shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निलेश लोढा यांची पंचांगावर आधारित मराठी दिनदर्शिकेचे नगरकरांनी केले स्वागत ...



 नवदाम्पत्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

 प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : १४ / नगर शहरातील लोकप्रिय शेअर ब्रोकर निलेश लोढा यांच्या २०२४ या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भावना राजेंद्र लोढा आणि कुणाल श्रेणिक शहा या नववधू-वराच्या हस्ते नंदनवन लॉन्स मधील दिमागदार लग्न सोहळ्यात झाले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पंडित दीनदयाल पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा, शिवसेनेचे नेते संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, अजय चितळे, संतोष गेनप्पा, गणेश कवडे, रा. स्व.संघाचे प्रशांत सहस्त्रबुद्धे ,राहुल पुरोहित, वर्धमान पितळे, बजरंग दलाचे कुणाल भंडारी, अनुराग आगरकर, अंतू वारूळे, केवळचंद लोढा, विनोद लोढा, राजेंद्र लोढा, राहुल लोढा चेतन लोढा, गोविंदा डागा, अनय घोगरे निलेश दुस्सा, किरण घनवट तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या .

पंचांगावर आधारित असलेल्या या मराठी दिनदर्शिकेचे वर्गीकरण इंग्रजी बारा महिन्यात केले आहे. यामध्ये मराठी महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती दिली आहे. लोढा यांच्या दिनदर्शिका प्रकाशनाचे हे पाचवे वर्ष आहे.

निलेश लोढा यांनी सांगितले की , जाणकार गुंतवणूकदारांना  मार्गदर्शनाचा योग्य फायदा होत आहे . सध्या भारतीय शेअर्स बाजारात चांगला परिणाम दिसत असुन शेअर बाजार आता उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे. सध्या गुंतवणुक करणारांना चांगला परतावा मिळण्याची संधी असल्याचे  सांगितले .
close