shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुणवत्तेबरोबर कला व क्रीडा विभागातही जि. प. शाळेतील मुले अव्वल.*


*गुणवत्तेबरोबर कला व क्रीडा विभागातही जि. प. शाळेतील मुले अव्वल.*

*श्री बाबीर विद्यालय रूई येथे दोन दिवस कला क्रीडा महोत्सवातील तालुका स्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न.*
इंदापूर :- दि ९ व १० पंचायत समिती आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवातील तालुका पातळीवरील स्पर्धा श्री बाबीर विद्यालय रूई येथे दि ९ व १० रोजी दिवस संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात व विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांचे हस्ते झाले. 
             *यावेळी गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.* विद्यालयाचे वतीने दोन दिवस स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक पाटील सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दुसरे दिवशी *पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचै माजी सभापती प्रविण माने यांचे हस्ते खो खो अंतिम सामान लावण्यात आला. यावेळी माने यांनी मुलांसोबत खो खो खेळण्याचा आनंद लुटला.*
       पहिल्या दिवशी मैदानी स्पर्धा झाल्या व दुसरा दिवस लोकनृत्य , लेझीम , भजन , वक्तृत्व , प्रश्न मंजुषा स्पर्धा झाल्या मुलांनी उपस्थितींची मने जिंकली. स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे लहान गट ५० मी धावणे प्रथम क्रमांक मुले हुजेफ बक्षी , मुली त्रिशा सल्ले धावती उंच उडी मुले सोहम बंडगर , मुली त्रिशा सल्ले , लांब उडी यशराज डोळे , जान्हवी म्हेत्रे , वक्तृत्व इशा वायसे , कबड्डी मुले व मुली प्रथम क्रमांक वायसेवाडी , खो खो मुले व मुली प्रथम क्रमांक शिंदेवस्ती , लेझीम मुले प्रथम अंथुर्णे , मुली भिगवण , लोकनृत्य प्रथम क्रमांक कांदलगाव , भजन प्रथम सरस्वतीनगर , प्रश्न मंजुषा प्रथम प्रताप जौंजाळ , सिद्दी राऊत मोठा गट १०० मी धावणे प्रथम क्रमांक समर्थ उणवने , श्रावणी शेलार , उंच उडी प्रथम प्रणव बरळ , अक्षता पवार , लांब उडी सार्थक जाधव , अनुष्का झगडे , गोळा फेक समर्थ शिंदे , अनुष्का झगडे , वक्तृत्व अनुश्री कांबळे , कबड्डी मुले भिगवण , मुली आगोती नं १ , खो खो मुले व मुली वायसेवाडी ,थाळीफेक नाना गंगावणे , मुली सृष्टी नगरे , लेझीम मुले भिगवण , मुली लाकडी ,लोकनृत्य भिगवण , भजन वायसेवाडी , प्रश्न मंजुषा आरती गायकवाड , शानीद शेख भाट निमगाव स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी *विस्तार अधिकारी खळदकर साहेब , केंद्र प्रमुख हनुमंत शिंदे , संभाजी आजबे , मारूती सुपुते , भिवा हगारे , नाना दराडे , नवनाथ ओमासे , विषय तज्ञ संभाजी खंडागळे , नितीन साबळे , यांनी संयोजन केले. इंदापूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ व माध्यमिक क्रीडा शिक्षक यांनी पंचाची कामगिरी केली. बाबीर विद्यालय सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले. यावेळी स्पर्धेक विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले व आभार विश्वजीत करे यांनी मानले.*

close