इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रताप पालवे तर व्हॉइस चेरमनपदी विजयराव घोगरे यांची निवड.
इंदापूर:इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन,व्हॉइस चेअरमन कार्यकाळ संदर्भात
ठरलेल्या काळानुसार पंजाबराव गायकवाड यांनी चेअरमन पदाची तर जाऊद्दीन शेख यांनी व्हॉइस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
इंदापूर तालुक्यातील इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन ,व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ओझरे गावचे वज्रेश्वरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रताप पालवे यांची चेअरमन पदी तर बावडा गावचे विजयराव घोगरे यांची व्हॉइस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पंजाबराव गायकवाड, जाऊद्दीन शेख, हरिभाऊ जाधव,अमोल भोईटे,सचिन जाधव, कैलास येरळकर, बाळासाहेब मोरे ,राहुल मिसाळ, मकरंद जगताप , विष्णुपंत देवकाते, जयंत जाधव, बाळासाहेब शिंदे, फातिमा पठाण, प्रतिभाताई पवार ,सचिव आबा फलपले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,
यानंतर अभिनंदनाचा कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, उपसभापती रोहित मोहोळकर, ज्येष्ठ संचालक मधुकर भरणे, आबा पाटील,निरा भिमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के , युनूस पठाण,ओम पवार, अभिजीत घोगरे, ज्ञानदेव बागल, हनुमंत शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निरा भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार अमोल भोईटे यांनी मानले .

