shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत विद्यार्थांसाठी महाबचत बँक सुरु

गौराईमळा शाळेत विद्यार्थांसाठी महाबचत बँक सुरु  
इंदापूर : दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या गौराईमळा शाळेत विद्यार्थ्यां साठी महाबचत बँक सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केली. यानंतर महाबचत बँक सुरु करण्याचा मुख्य उद्देश हा मुलांना बँकेतील व्यवहाराची माहिती व्हावी  आणि भरणा चलन व नावे चलन कशा पद्धतीने भरले जाते तसेच खाऊ्च्या पैशातुन बचत करावयाची सवयी लागावी या उद्देशाने महाबचत बँक सुरु केली असुन सर्व मुलांना खाते क्रमांक पण देण्यात आलेले आहेत.
          या वेळी शेळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उर्मिला लक्ष्मण शिंगाडे , उपसरपंच सौ. रेश्माताई जाधव,  ग्रामपंचायत सदस्या सौ.अश्विनीताई  शिंगाडे ,सदस्य प्रतापसिंह चवरे  तसेच मा.पंचायत समिती सदस्य श्री.लक्ष्मण शिंगाडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नाझरकर ,श्रावणकुमार जाधव , तात्यासाहेब शिंगाडे ,दिपक शिंगाडे , उमेश शिंगाडे ,परशुराम  शिंगाडे,  विलास शिंगाडे ,विनोद नाझरकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते 
     शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी उपस्थितीत पदाधिकारी  ग्रामस्थांचे आभार मानले
close