*परिषदेसाठी पाच राज्यातील समाज बांधवांची उपस्थिती
राजेंद्र बनकर / शिर्डी
देशातील धनगर, रबारी, मालधारी, भरवाड समाजाच्या पशुपालकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना यासाठी शिर्डी येथे राष्ट्रीय पशुपालन न्याय हक्क परिषदचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा होते.
विचारपिठावर भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रभारी संजय केनेकर , प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,गोसेवा आयोगाचे सदस्य सनतकुमार गुप्ता , विश्व हिंदू परिषदेचे प्रांतीक कार्यवाह भाऊराव कुदळे,भटके विमुक्त आघाडी चे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे , सरचिटणीस , राजेंद्र साळुंके , युवराज मोहिते ,रवी शिंदे,, , रघुभाई भरवाड, रामभाई जोगराना,ॲड. भाग्यश्री ढाकणे, साजनभाई रबारी, मशरूभाई मालधारी, विभाभाई भरवाड, भलाभाई भरवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पशुपालन संदर्भात येणाऱ्या अडचणी , गायरान जमिनीवरील अतिक्रमणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना पोलिस, वनविभाग आणि काही तथाकथीत संघटनच्या लोकांकडुन होणारी आर्थिक पिळवणूक,देशी गायीचे संगोपन आणि संवर्धन, शासकीय योजना आदी विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली.येणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करता येतील असे मान्यवरांनी यावेळी आश्वासन दिले.
गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा, भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अध्यक्ष राहुल केंद्रे यांची निवड झाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या परिषदेचे आयोजन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी संयोजक तथा भारतीय धनगर समाज विकास परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष सिध्देश्वर बापु शिंदे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला छत्तीसगड , राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी केले तर आभार रघुभाई मिर यांनी मानले.
यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

