पुणे:-
मुकेश प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेली ०७ वर्ष सातत्याने समाजातील उपेक्षित (दुर्लक्षित) घटकांसाठी नवीन वर्षाची पूर्वसंध्या वैविध्यपूर्ण रीतीने साजरी केली जाते....
यंदाच्या वर्षीचा उपक्रम *हॉटेल वैशाली* च्या टेरेसवर दिव्यांग विद्यार्थी मित्रांकरिता *थोडा हटके* पद्धतीने साजरा करण्यात आला.....
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ०२ संस्था सहभागी झालेल्या:-
०१. *अभिसार फाऊंडेशन* , वाकड
०२. *संत गजानन महाराज शिक्षण संस्था,* संचलित निवासी मतिमंद विद्यालय चऱ्होली,पुणे
तसेच दिव्यांगत्वावर मात केलेले आकाश दादा पवार, अनिकेत दादा जगताप, जालिंदर दादा तुळशीदास मंगळवेढेकर उपस्थित होते, भोसरी येथील सर्वेश दादा दिगंबर कुंभार यानेही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या सर्वांना आशिर्वाद देण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलेल तृतीय पंथी डॉ.दीपा ताई, माई देशमुख (पुण्यातील सुप्रसिद्ध तुळशी बागेतील व्यापारी), समीर (यांनी सर्वांना त्यांच्या बरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिली, व सर्वांना प्रभावित केले), परशुराम वाणी (उत्कृष्ट रांगोळीकार) अश्या सर्वानी दिव्यांग मुलांच्या आरोग्य व उदंड आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले...
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अंजली खामेतकर मॅडम (निर्भीड पत्रकार) बी. एम. सी. सी. च्या शिक्षिका राजश्री गोखले मॅडम, ज्योती देशपांडे मॅडम लाभले..
बुधवार पेठेत देवदासीच्या मुलांच्या शिक्षणा साठी काम करणार्या अलका ताई गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले....
मुकेश प्रतिष्ठानचे सर्व सहकारी मंडळी सचिन दादा दगडे, जय भाऊ गायकवाड, काळूराम विटकर, सौरभ देशपांडे सर, समद भाई शेख, सनी दादा मुरुडकर, आशिष दादा दरेकर, डॉ. राज भुजबळ, गणेश दादा आबनावे यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.....
प्रसिद्ध गायक आ. जितेंद्र दादा भूरुक यांनी मुलांना आणि सर्वांसाठी एक प्रोत्साहन देणारे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली...
गिरीश दादा सोनावणे यांचेही आभार...
यावेळी हॉटेल वैशाली, एफ सी रोड यांचे विशेष आभार मानले.
महेंद्र सुमन रामदास पवार
अध्यक्ष
मुकेश प्रतिष्ठान

