shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून स्वतः ला कर्तृत्ववान बनवा .... आ. नमिता मुंदडा!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून स्वतः ला इतके कर्तृत्ववान बनवा की समाजाला ही तुमच्या कर्तृत्ववाचा हेवा वाटला पाहिजे असे मत आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.

ज्ञानजोती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि शहरातील विविध शाळांमधील गरजवंत मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात आ. नमिता अक्षय मुंदडा बोलत होत्या. उत्साहात अंबाजोगाई येथे साजरी करण्यात आली

    



ज्ञानज्योती सावित्रीमाई जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणा-या बालिका दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मा.आ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या शुभ हस्ते शहरातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पूजा गोरे (पी.एस.आय.), प्रा.पुजा राऊत, शुभांगी परमार (क्रिकेट कोच) , मयुरी मुंडे (योगा आणि हॉकी), संध्याराणी कोल्हे (शिक्षिका), ऋतुजा ठोके (सहकार अधिकारी) , आर्यन वाकडे (क्रिकेट) तसेच विविध शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    

या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, डॉ.अतुल देशपांडे,  माजी नगराध्यक्ष महादु मस्के, डॉ.सोनाली अनिल मस्के, बाबुराव आडे, डॉ.सुरेश अरसूडे,  नभा वालवडकर, वर्षा मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत अरसूडे यांनी केले  तर सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना  आ.नमिता मुंदडा यांनी विद्यार्थ्यांशी तसेच उपस्थितांसोबत मनमोकळे पणाने संवाद साधला तसेच त्यांना मार्गदर्शन देखील केले.

या प्रसंगी सौ.संगीता काटे, प्रा.जयश्री डाके, सौ.अंजली अरसूडे, सौ.सुनीता जाधव , सौ. अनिता किर्दंत, सौ.मसने , 

आयोजक ज्ञानज्योती सावित्रीमाई जोतीराव फुले जन्मोत्सव समिती अंबाजोगाईचे अनंत आरसुडे ,बळीराम चोपणे, पद्माकर काटे, गणेश रुद्राक्ष, सुनील मस्के, मंदार काटे ,प्रशांत आदनाक, अजय राठोड, सुरेश मुकडे, विष्णु राऊत, प्रकाश चोपणे, श्री डांगे, वेंकटेश किर्दत ,गोपाळ मस्के, महेश अंबाड, प्रदिप चोपणे , अक्षय शिंदे, योगेश कडबाने, आनंत मसने, अमोल घोडके ,पवन जिरे,ओंकार पोतदार, पवन घोडके, निकेश जगदाळे, विष्णु जाधव, अमोल साखरे,अक्षय भूमकर ,अतुल कसबे , सत्यप्रेम इंगळे, सचिन केंद्रे, सचिन वाघमारे, माऊली वैद्य, सय्यद अन्सार,शरद करपे, अविनाश आडे, अविनाश आडे, व खोलेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक व्रंद कर्मचारी , विद्यार्थी ,विद्यार्थीनी , आणि महिला व पुरुष यांची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती.

close