shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत बालिका दिन साजरा

गौराईमळा शाळेत बालिका दिन साजरा
 इंदापूर: दि. ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या गौराईमळा शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती *बालिका दिन* म्हणून साजरी करण्यात आली.प्रथम सौ. प्रियांका जाधव व सौ.  सारिका शिंगाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जुबेदा पठाण मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विद्यार्थी मनोगते झाली.  पठाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. जयंती निमित्त शाळेत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमासाठी इयत्ता १ ली ते ४ थीतील मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच संस्कृती शिंगाडे, प्रिया शिंगाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल भाषण करुन समाजात आता खरेच सावित्रीच्या लेकी म्हणुन राहताना अभिमान वाटतो असा संदेश आपापल्या भाषणातून दिला. शेवटी श्रेयश नाझरकर याने   उपस्थितांचे आभार मानले.
close