श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगांव मंडळातील मराठा समाज मराठा कुणबी,कुणबी मराठा,पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करणेकामी नोंदणी प्रक्रियेसाठी सकाळी ९ वाजेपासून उंदिरगांव येथे नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. त्यासाठी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, श्रीरामपूर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन नोंदणी करताना दिसत होते.
त्यासाठी लाभार्थी व त्यांची कुटुंबातील वंशावळ,शाळा सोडल्याचा दाखला,वडील,चुलत्याचा,भावाचा शाळा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र,कुणबी जातीबाबतचा जन्म मृत्यू नोंद,उतारा आदी पुरावा,मोडी लिपीत असल्यास वाचकाचे प्रतिज्ञापत्र,वंशावळ स्पष्ट होणारे फेरफार,सातबारा उतारा,क.ड.इ. पत्रक,खरेदी खते, रेशन कार्ड तसेच कोणताही शासकीय पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक असतात.नोंदणी झाल्यावर प्रमाणपत्र सात दिवसांनी संबंधिताना मिळणार असल्याचे शासकीय अधिकारी यांनी सांगितले.यावेळी नोंदणी साठी शासनाचे उंदिरगांव मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ,तलाठी कुणाल काळे,तलाठी अविनाश तेलतुंबडे,तलाठी संदीप पवार, तलाठी संतोष चव्हाण,कोतवाल संदीप नवसरे,गणेश बिरदवडे, हे शिबिरात कार्यरत होते.प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रियेच्या वेळी सकाळी उंदिरगांव येथील माजी चेअरमन सुरेश गलांडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाउलबुद्धे,अशोक कारखाना संचालक विरेश गलांडे,राजेंद्र नाईक,भीमभाऊ बांद्रे,दिलीप गलांडे, जितेंद्र गोलवड, बाळासाहेब नाईक,सोपानराव नाईक,अशोक गलांडे,आदी उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

